बिबट्याला पाहून भल्याभल्यांची घबराट होते. मात्र एका तरुणांने बिबट्याला मांजरीसारखं शेपटीला धरून गर-गर फिरवलंय. कर्नाटकातील तुमकुरू येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. तरुणाच्या शौर्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
तरुणाची हिंमत पाहून वनअधिकारी देखील आश्चर्यचकित झाले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुणाने पळून जाणाऱ्या बिबट्याची शेपटी मोठ्या धाडसाने पकडली आणि नंतर त्याला पिंजऱ्यात टाकण्यास मदत केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, तिप्तूरच्या चक्ककोटीगेनहल्ली गावात लोकांमध्ये या बिबट्यामुळे भीतीचे वातावरण होते. त्यामुळे बिबट्याला पकडण्याची मोहिम वनविभागाने हाती घेतली होती. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही तो पकडला जात नव्हता.
(नक्की वाचा- Cricket News : क्रिकेटच्या मैदानात फलंदाजावर पैशांचा पाऊस, पैसे गोळा करण्यासाठी गर्दी)
दरम्यान, मंगळवारी बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील रहिवासी आनंद याने बिबट्याची शेपटी पकडली आणि त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पकडले.
(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)
बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना हल्ले करत होता. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ग्रामीण भागात अशा प्रकारे बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता या बिबट्याला पकडल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे.