अमजद खान, कल्याण
कल्याणजवळ असलेल्या कोनगावात एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या एका खेळाडूवर एक व्यक्ती पैशांची उधळण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पैशांची उधळण करणाऱ्यावर पोलीस कारवाई करणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
क्रिकेट आणि क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये एक वेगळं नातं असतं. चाहता आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी काय करेल याचा काही अंदाज नसतो. अशाच एका क्रिकेटप्रेमीचा व्हिडीओ समोर आला आहे.
(नक्की वाचा- GST Notice to Panipuriwala : तामिळनाडूतील पाणीपुरीवाला GST नोटीसमुळे चर्चेत, कमाई पाहून सगळेच चक्रावले!)
कोनगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एक स्पर्धा भरवण्यात आली होती. भाजपच्या स्थानिक नेत्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात घोटसाई बी टीमचे दोन फलंदाज मैदानात होते. फरदिन नावाचा फलंदाज 21 धावांवर खेळत होता, तर दुसरा फलंदाज पवन 35 धावांवर खेळत होता.
पवनने अवघ्या 9 बॉलमध्ये 35 धावा कुटल्या. त्याची बॅटिंग पाहून खुश झालेल्या एका प्रेक्षकाने थेट मैदानात येत पवन याच्यावर पैशांचा पाऊस पाडला. नंतर हे पैसे गोळा करून पवनला देण्यासाठीही अन्य प्रेक्षकांनी मैदानात गर्दी केली. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)
विकास भोईर असे पैशांची उधळण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो कोनगाव परिसरात राहणारा असून क्रिकेटचा चाहता आहे. दरम्यान ज्या पद्धतीने हे पैसे उडवण्यात आले, ते योग्य की अयोग्य? यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world