3 days ago

वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या एकूण १० याचिका दाखल करण्यात आल्या आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. 

Apr 17, 2025 22:02 (IST)

Live Update : निलंबित अधिकारी रणजीत कासले अखेर हजर

निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले अखेर पुण्यामध्ये हजर झाला आहे तो पुणे विमानतळावर उतरला आणि त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी त्याने पुन्हा एकदा आरोप करत दहा लाखांची रक्कम ही मला दिली गेली होती एन्काऊंटर च्या संदर्भात देखील पुन्हा एकदा त्यांनी खुलासा केला आहे एकूणच सगळ्या बाबतीत त्यांनी पुन्हा एकदा आरोपांची तोफ डागली. आता पुणे पोलीस त्यांना थोड्याच वेळात ताब्यात घेतील

Apr 17, 2025 21:07 (IST)

नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक

  नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात सहावी अटक

* नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक 

* महेंद्र भाऊराव मैसकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव..

* सदरील आरोपी हा शिक्षक भरती संदर्भातील प्रस्ताव बनवायचा अशी माहिती..

* यापूर्वी विभागीय उपसंचालक उल्हास नरड सह चार असे एकूण पाच आरोपींना अटक.

* आता शिक्षक घोटाळा प्रकरणात आरोपीची संख्या सहावर अजून काही नावे समोर येण्याची शक्यता..

Apr 17, 2025 20:18 (IST)

ससून हॉस्पिटलचा तनिषा भीसे प्रकरणात अहवाल आला समोर

ससून हॉस्पिटलचा तनिषा भीसे प्रकरणात अहवाल समोर आला आहे.  डॉ. घैसास यांनी कोणतेही गंभीर आक्षेपार्ह कृत्य केलेले नाही असं या अहवालात म्हटलं आहे.  त्यांच्या विरोधात पुरावे फारसे उपलब्ध नाहीत, असं ही म्हटलं आहे.  मणिपाल, सूर्या आणि इंदिरा आयव्हीएफ यांनी काही चुका केल्या आहेत.  मणिपाल हॉस्पिटल यांनी कोणतेही पोस्टमार्टम केलेले नाही. सूर्यामध्ये प्रवेशादरम्यान कोणतेही विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते, जे नियमांमध्ये नव्हते, ससूनच्या अहवालानुसार या बाबी मांडण्यात आल्या आहेत.

Apr 17, 2025 18:51 (IST)

सांगलीच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्ताना 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

 सांगलीच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. चाळीस हजाराची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आल आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात नितीन उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांवरच कारवाई झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 

Advertisement
Apr 17, 2025 18:50 (IST)

मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे.   विधानसभा निवडणुकीला आवाहन देणाऱ्या प्रकरणात समन्स जारी केले आहे. 8 मे पर्यंत उत्तर सादर करण्याचे दिले निर्देश दिले आहेत.  काँग्रेसचे प्रफुल गुडदे पाटील यांनी निवडणुकीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दिली आहे.  विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुडदे पाटील यांचा पराभव झाला होता.

Apr 17, 2025 18:10 (IST)

सोलापुरात मंत्री नितेश राणे यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दाखवले कोंबड्याचे चित्र

- सोलापुरात मंत्री नितेश राणे यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दाखवले कोंबड्याचे चित्र 

- सोलापूर विमानतळा बाहेर नितेश राणे यांचा ताफा येत असताना दाखवले कोंबड्याचे चित्र 

- कागदावर कोंबड्याचे चित्र काढून मंत्री नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला 

- नितेश राणे आज हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सोलापुरात दाखल झालेत 

- यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संतोष घोडके आणि शिवसैनिकांनी दाखवले कोंबड्याचे चित्र 

- नितेश राणे यांचा ताफा विमानतळाबाहेर पडत असताना केला निषेध

Advertisement
Apr 17, 2025 18:01 (IST)

MPSC मुख्य परीक्षा 2024 च्या तारखेत बदल

MPSC  मुख्य परीक्षा 2024 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे.  ही परिक्षा आता 27,28, आणि 29 मे या तारखेला होणार आहे. विद्यार्थ्यांना आंदोलन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Apr 17, 2025 15:16 (IST)

Live Update : त्र्यंबकेश्वरमध्ये देणगी दर्शनाचा काळाबाजार उघडकीस, गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांच्या होणाऱ्या लुटीचा प्रकार NDTV मराठीने उजेडात आणला होता आणि आता देणगी दर्शनाच्या नावाखाली ईथे काळाबाजार सुरू असल्याची एक घटना समोर आली असून याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. गुजरातच्या सूरतहून चिराग दालिया आणि काही भाविक गेल्या वर्षी मार्च महिन्यात दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला आले होते दरम्यान याचवेळी नारायण मुर्तडक नावाच्या एका दलालाने

त्यांना 200 रुपये किमतीचे तिन देणगी पास दिले मात्र त्याबदल्यात 600 ऐवजी त्याने दोन हजार रुपये घेत काही मिनिटात दर्शन करून देण्याचे आमिषही दाखविले. 

Advertisement
Apr 17, 2025 14:52 (IST)

Live Update : वक्फ बोर्डावर नवीन नियुक्ती नको - सर्वोच्च न्यायालय

वक्फ बोर्डावर नवीन नियुक्ती नको - सर्वोच्च न्यायालय

वक्फ संदर्भातील पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार

Apr 17, 2025 13:19 (IST)

Live Update : पुणे सातारा महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला पेट

पुणे सातारा महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला पेट 

कात्रज शिंदेवाडी येथील ब्रिजवर बसमधून अचानक धूर येऊ लागला होता. पुणे सातारा महामार्गावरील पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. आज मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार बसमधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. ही बस कोल्हापूरवरून पुण्याच्या दिशेने जात होती. हा गाडी खाजगी टुरिस्ट कंपनीची आहे. 

Apr 17, 2025 13:10 (IST)

Live Update : धनंजय मुंडे यांचा नारळी सप्ताह निमित्ताने होणारा पिंपळनेर दौरा रद्द

 धनंजय मुंडे यांचा नारळी सप्ताह निमित्ताने होणारा पिंपळनेर दौरा रद्द 

सकाळी दहा वाजल्यापासून मुंबई विमानतळावर आहे मात्र काही तांत्रिक कारणांनी उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने हा दौरा रद्द केला जात आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत धनंजय मुंडे यांनी महंत शास्त्री यांना कल्पना दिली तर मुंडे यांनी याबाबत क्षमा देखील मागितली आहे. 

Apr 17, 2025 12:17 (IST)

Live Update : वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील तलावाच्या पाणी पातळीत घट..

हिंगोली जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा वाढला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवताना दिसत आहे. जिल्ह्यातील विहीर बोअरवेल तलाव यासारखे पाण्याचे स्त्रोत कोरडे ठाक पडले आहेत.. तर या वाढत्या तापमानाचा फटका जिल्ह्यातील सिंचन तलावाला देखील बसला आहे, हिंगोलीतील अंभेरी तलावामध्ये मागील पंधरा दिवसात 19 टक्के इतकी पाण्याची घट झाली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.. 

Apr 17, 2025 11:16 (IST)

Live Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच एल्गार आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच एल्गार आंदोलन 

वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर 

केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादीकडून आंदोलन 

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून घोषणाबाजी 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन

Apr 17, 2025 08:13 (IST)

Live Update : महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार

राष्ट्रीय समाज पक्षाकडून पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे. अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. फुले वाड्याजवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 20 तारखेला महादेव जानकर यांचा 50 वा वाढदिवस याच दिवशी राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. 

राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता तिन्ही नेते एकत्र येत मोठा निर्णय घेणार अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आणि फुले वाड्याला येण्याचं आव्हान सर्व कार्यकर्त्यांना बच्चू कडू यांनी केला आहे. 

Apr 17, 2025 07:21 (IST)

Live Update : धनंजय मुंडे आणि सुरेश धस आज एकाच कार्यक्रमात येण्याची शक्यता

धनंजय मुंडे आणि सुरेश धस आज एकाच कार्यक्रमात येण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील पिंपळनेर गावात एका कार्यक्रमानिमित्त आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे या दोघांनाही निमंत्रण आहे. धनंजय मुंडे मुंबई येथून हेलिकॉप्टरने पिंपळनेर येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुरेश धस हे १२ वाजेपर्यंत पोहोचतील. दोन कट्टर विरोधक नेते यावर्षी पहिल्यांदाच धार्मिक कार्यक्रमात एकत्रित दिसणार आहेत. 

Apr 17, 2025 07:18 (IST)

Live Update : भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी मुंबईतील नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी आता मुंबईतील नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजप मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या नावाला मात्र पक्षातूनच विरोध होत असल्याच्या चर्चा आहेत. दरेकर हे मूळ भाजपचे नसून ते इतर पक्षातून आले असल्याने त्यांना पद देऊ नये, असे काही नेत्यांचे मत असल्याच्या चर्चा आहेत.