पश्चिम बंगालमधील (West Bengal) मौलाना अब्दुल कलाम आझाद तंत्रज्ञान (Maulana Azad Abdul Kalam University) विद्यापीठातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला प्रोफेसर पायल बॅनर्जीने आपल्याच वर्गातील प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यासोबत लग्न केलं. मंगळवारी ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने प्रोफेसरला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
हा विचित्र प्रकार पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठात घडला. अप्लाइड सायकोलॉजी (Applied Psychology) विभागाच्या प्रमुख महिला प्रोफेसर मंगळवारी लाल रंगाची बनारस साडी आणि केसात गुलाबाची फूल माळून वर्गात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत प्रथम वर्षाचा विद्यार्थीदेखील होता. वर्गाच्या मधोमध विद्यार्थी आणि प्रोफेसरने एकमेकांना फुलांची माळ घातली. विद्यार्थ्याने प्रोफेसरला कुंकूही लावलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हिडिओ व्हायरल...
यादरम्यान विद्यार्थ्याच्या खांद्यावर एक शाल होती, जी प्रोफेसरच्या पदराला बांधली होती. लग्नात सप्तपदी घेण्यापूर्वी ज्या प्रकारे तयारी केली जाते, तशीच तयारी इथंही दिसत होती. वर्गातील इतर विद्यार्थी हा सर्व प्रकार पाहून हैराण झाले. काही विद्यार्थ्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करीत प्रोफेसरला सक्तीच्या रजेवर पाठवलं. याशिवाय लग्न केलेला विद्यार्थीही बेपत्ता आहे.
नक्की वाचा - Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...
महिला प्रोफेसरने दिलं स्पष्टीकरण...
या प्रकरणात पायल बॅनर्जी म्हणाल्या, प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यासोबत वर्गात लग्नाचा सायकोड्रामा सुरू होता. विद्यार्थ्यांनी मला नवरीची भूमिका वठवण्याची विनंती केली होती. मी त्यांची विनंती मान्य केली. अन्य शिक्षक वर्गाला याबाबत माहिती होती. त्यांनी यासाठी परवानगीही दिली होती.
A lady Professor in MAKAUT is 'getting married' to her young student in the office. pic.twitter.com/coXaVGH7s7
— Abir Ghoshal (@abirghoshal) January 29, 2025
त्यावेळी कोणीच आक्षेप घेतला नाही. माझ्या वर्गातील विद्यार्थी आणि मी संहितेनुसार अभिनय केला. यात काहीच चुकीचं नाही. काहीजण माझ्याविरोधात कट रचत आहेत. हे सर्व कोणी केलं, याबाबत मला माहित आहे. माझ्याकडे त्या व्यक्तीविरोधात बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. त्यामुळेच हा कट रचला आणि वर्गातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world