Total Solar Eclipse: सूर्यग्रहण म्हणजे काय? ते कसं दिसतं?

जाहिरात
Read Time: 2 mins
सूर्यग्रहण म्हणजे काय? ते कसं दिसतं?
मुंबई:

लहानपणी शाळेमध्ये शिकवण्यात आलेल्या माहितीनुसार, आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरतो . अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. पण हे सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? चला जाणून घेऊया सविस्तर...

सूर्यग्रहण म्हणजे काय...?

  • पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होतं. 
  • चंद्रामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. 
  • याला सूर्य ग्रहण स्थिती म्हणतात.
  • चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाची खग्रास, खंडग्रास वा कंकणाकृती स्थिती दिसतो.
  • पूर्ण सूर्यग्रहण पृथ्वीच्या अगदी लहान भागातच दिसतो. 
  • सूर्यग्रहणाच्या प्रसंगी चंद्राला सूर्यासमोरून जाण्यासाठी सुमारे दोन तास लागतात आणि या वेळी चंद्र जास्तीत जास्त सात मिनिटे सूर्याला पूर्णपणे झाकतो.

खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?

  • पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
  • चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे.
  • पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. 
  • पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. 
  • म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.

खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?

  • सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

  • पृथ्वी आणि चंद्राच्या कक्ष काहीशा लंबगोलाकार आहेत. 
  • पृथ्वीवरून चंद्राचा आकार सूर्यापेक्षा लहान दिसतो.
  • जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्याच्या मधोमध येतो.
  • सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. 
  • यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. 
  • सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.

ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?

  • ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. 
  • सूर्याच्या तीव्र कीरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
  • ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. 
  • पिनहोल कॅमेरा किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते. 

पूर्ण सूर्यग्रहण म्हणजे काय...?
पृथ्वीभोवती फिरत असताना, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याच वेळी तो सूर्याला व्यापतो, तेव्हा सूर्याची दृश्यता पूर्णपणे थांबते, या परिस्थितीत, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही आणि अंधार पसरतो. अशा ग्रहणाला संपूर्ण सूर्यग्रहण म्हणतात.

हेही वाचा : 

Total Solar Eclipse : 'आदित्य एल-1' ला का दिसणार नाही सूर्यग्रहण? वाचा कारण...