गॉडझिला अल् निनो काय आहे? भारताच्या दिशेने वाटचाल; शेतीपासून पॉवरग्रीडपर्यंत सर्व उद्ध्वस्त होण्याचा महाधोका!

भारतातील नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेती, सिंचनाचे स्त्रोत आणि पॉवर ग्रीड नष्ट होऊ शकतात.  

जाहिरात
Read Time: 3 mins

What is Godzilla El Nino : देशात दक्षिण-पश्चिम मान्सूनने एक आठवड्यापूर्वीच धडक दिली असली तरी यंदा मान्सूनकडून कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सूनचा पहिला आठवडा निराशाजनक राहिला, कारण आतापर्यंत १२ टक्के कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. इतकच नाही तर आयएमडीने यंदा एकूण ९० टक्के मान्सून होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच अधिकाऱ्यांनी मान्सूनच्या दुसर्‍या टप्प्यात अल निनोची स्थिती गंभीर होण्याचा इशारा दिला आहे. याचा शेतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

यासर्वात आंतरराष्ट्रीय हवामान वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात उष्ण पाण्याचा एक विशाल भाग लवकर भारताच्या दिशेने येत आहे. भारतातील नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेती, सिंचनाचे स्त्रोत आणि पॉवर ग्रीड नष्ट होऊ शकतात.  

Advertisement

गॉडझिला अल निनो काय आहे?

प्रशांत महासागरता हजारो किलोमीटर दूर पाण्याच्या त्या उष्ण प्रवाहाला वैज्ञानिकांनी गॉडझिला अल निनो किंवा सुपर अल निनो म्हटलं आहे. जे भारतासाठी धोक्याची घंटा आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या इतिहासात हा सर्वात शक्तीशाली अल निनो सिद्ध होऊ शकतात. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान नेहमीपेक्षा जास्त होतं, त्यावेळी संपूर्ण जगाचं हवामान, हवा आणि पावसाच्या चक्रावर त्याचा परिणाम होतो. 


हा एक नैसर्गिक हवामानाचा पॅटर्न...

वैज्ञानिक अल निनोवर लक्ष ठेऊन आहेत. हा एक नैसर्गिक हवामानाचा पॅटर्न आहे, ज्याचा परिणाम जगभरातील हवामानवर होऊ शकतो. हा उष्ण कटिबंधीय प्रशांत भागात सुरू  होतं, मात्र याचा परिणाम दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या बदलाच्या माध्यमातून भारतपर्यंत पोहोचतो. मान्सूनमुळे पाऊस येतो, ज्यामुळे जलाशयांमध्ये पाणी भरतं आणि त्याचा वापर शेतीपासून उद्योग धंद्यापर्यंत होतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसह जगातील अनेक संस्थांनी इशारा दिली आहे की, येणारा अल निनो केवळ हवामानातील एक घटना नाही त्यागून अधिक गंभीर रुप आहे. याचा परिणाम शेती, ऊर्जा, ट्रान्सपोर्ट आणि खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेवर परिणाम करू शकतो. 


गॉडझिला अल निनो कसा तयार होतो? 

जेव्हा भूमध्य रेखेजवळ मध्य आणि पूर्ण प्रशांत महासागरात समुद्राचं पाणी सामान्यापेक्षा अधिक उष्ण होतं, त्यावेळी वाऱ्याची दिशा बदलते आणि अल निनो तयार होतो. गॉडजिला नावाचा वापर तेव्हाच केला जातो, ज्यावेळी एक घटना असाधारणपणे मजबूत, प्रचंड आणि विनाशकारी असेल. हे नाव कोणतंही अधिकृत वैज्ञानिक वर्गीकरण नाही तर एक लोकप्रिय उपनाव आहे. 

नक्की वाचा - Mahabaleshwar News : 'महाबळेश्वरवर बहिष्कार घाला', कर्मचारी अंगावर आले धावुन; पर्यटकांचा संताप

पॉवर ग्रीडवर परिणाम...

एकीकडे विजेचं उत्पादन कमी होईल, तर दुसरीकडे भीषण उकाड्यामुळे पंखा, एसी आणि रेफ्रिजरेशनची मागणी तुफान वाढेल. यामुळे देशाच्या पॉवर ग्रीडवर ताण येईल. भारतात गेल्या महिन्यात विजेची मागणी आतापर्यंतच्या सर्वात जास्त म्हणजे तब्बल २६५ गिगावॅट असल्याचं नोंदविण्यात आलं होतं. भारतात गेल्या वर्षी जून २०२५ मध्ये विजेची किमान मागणी २४२.७७ गिगावॅट नोंदविण्यात आली होती. तर २०२४ मेमध्ये २५० गिगावॅटपर्यंत पोहोचलं होतं. मात्र यंदा मे महिन्याचा रेकॉर्ड २६५ गिगावॅटपर्यंत पोहोचला आहे. 

मान्सून आणि शेतीवर काय होणार परिणाम?

वैज्ञानिकांनुसार, भारताच्या दक्षिण-पश्चिम मान्सूनला कमकुवत करू शकतो. भारतातील शेती, जलाशय आणि पाणीपुरवठ्यासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाऊस कमी झाला तर त्याचा थेट परिणाम शेती आणि पिकांच्या उत्पन्नावर होईल. या गॉडजिला अल निनोचा परिणाम केवळ शेतीपर्यंत सीमित राहणार नाही, तर कमी पावसामुळे नदी, जलाशयांमध्ये पाण्याचा स्तर घटेल, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू शकतो. पाणी कमी असल्यामुळे हायड्रोपॉवर उत्पादनावरही परिणाम होईल.  
 

Advertisement