प्रजासत्ताक दिनानिमित्ताने होणाऱ्या परेडच्या तिकिटांची विक्री ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यंदाची प्रजासत्ताक परेड तुम्ही जवळून पाहू इच्छित असाल तर सोप्या पद्धतीने ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. प्रजासत्ताक परेड व्यतिरिक्त बीटिंग रिट्रीटची संपूर्ण ड्रेस रिहर्सल आणि बीटिंग रिट्रीटची तिकीटं देखील ५ जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. तिकिटांच्या किमती आणि त्या कशा बुक करायच्या याची माहिती खाली दिली आहे.
तिकिटाच्या किमती...
प्रजासत्ताक डे परेड (२६ जानेवारी २०२६) १०० रुपये २० रुपये
बीटिंग रिट्रीटची संपूर्ण ड्रेस रिहर्सल (२८ जानेवारी २०२६) - २० रुपये
बीटिंग रिट्रीट (२९ जानेवारी २०२६) - १०० रुपये
या तिकिटांची विक्री ५ जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत असेल. सकाळी ९ ते दिवसाचा कोटा संपेपर्यंत बुकिंग सुरू राहील.
तिकीटं कुठून खरेदी कराल?
www.aamantran.mod.gov.in या संकेतस्थळावरुन थेट तिकीटं खरेदी करू शकता. तिकीट खरेदी करण्यासाठी ओरिजनल फोटो आयडी कार्ड उदा आधारकार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट आदी ओळखपत्र दाखवावे लागतील. प्रजासत्ताक दिन, बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल आणि बीटिंग रिट्रीट या तिन्ही कार्यक्रमांसाठी फक्त एकच फोटो ओळखपत्र आणावे लागेल.
तिकीट कुठून खरेदी करू शकता?
सेना भवन (गेट नंबर ५ जवळ)
शास्त्री भवन (गेट नंबर ३ जवळ)
जंतर-मंतर (मुख्य प्रवेशद्वाराजवळ)
संसद भवन (रिसेप्शन)
राजीव चौक मेट्रो स्टेशन (डी ब्लॉक, गेट नंबर ३ आणि ४ जवळ)
काश्मीरी गेट मेट्रो स्टेशन (कॉन्कोर्स लेव्हल, गेटनंबर ८ जवळ)
तिकीट विक्रीची वेळ..
सकाळी १० वाजता दुपारी १ वाजेपर्यंत
दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
