जाहिरात

Silver : ऐतिहासिक झेप! चांदी 2.50 लाखांच्या पार; अचानक कशी झाली वाढ? पुढे चांदी गडगडणार की....

चांदीच्या उपलब्धतेबाबत आणखी एका कारणामुळे चिंता वाढली आहे.

Silver : ऐतिहासिक झेप! चांदी 2.50 लाखांच्या पार; अचानक कशी झाली वाढ? पुढे चांदी गडगडणार की....

Silver Prices : २०२५ मधील चांदीच्या किमती पाहून गुंतवणुकदारांसह व्यावसायिकही हैराण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे तर पहिल्यांदाच ७५ डॉलर प्रति औंसच्या स्तराच्या पार गेली आहे. म्हणजे एक किलो चांदीची किंमत अडीच लाखांहून अधिक झाली आहे.  तज्ज्ञांच्या मते चांदीची ही वाढ भीतीने नाही तर खऱ्याखुऱ्या मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे निर्माण झाली आहे. 

गेल्या वर्षी जागतिक पातळीवर चांदीची मागणी त्याच्या पुरवठ्यापेक्षा जास्त राहिली. इंडस्ट्री रिपोर्ट्सनुसार, २०२५ मध्ये चांदीचा बाजार नुकसानीत म्हणजे डिफिसिटमध्ये होता. यावर्षी १० कोटी औंसपेक्षा जास्त तुटवडा जाणवू शकतो असा अंदाज आहे. ही कमतरता लवकर पूर्ण करणं सोपं नाही. कारण चांदी अधिकांश तांबे, झिंक आणि काचेसारख्या खाणेतून उप-उत्पादनाच्या रुपात काढली जाते. म्हणजे चांदीचा पुरवठा थेट वाढवता येऊ शकत नाही. त्यात खाणींमधील धातूची गुणवत्ता घसरत आहे आणि नवीन खाण सुरू होण्यासाठी १०-१२ वर्षांची प्रतीक्षा करावी लागते.

वाढत्या स्टॉकमुळे चिंता वाढली....

चांदीच्या उपलब्धतेबाबत आणखी एका कारणामुळे चिंता वाढली आहे. जगातील मोठे स्टोरेज आणि एक्सचेंच उदा, COMEX, लंडन वॉल्ट आणि शांघाईमधील स्टॉकमध्ये सातत्याने घट होत आहे. हा ट्रेंड स्पष्ट आहे की,  भौतिक चांदी वेगाने कमी होत आहे. परिणामी, गुंतवणूकदार आणि औद्योगिक खरेदीदार कागदी करारांपासून भौतिक चांदीकडे लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळे आभासी बाजार आणि फिजिकल बाजार यांच्यातील दरी आणखी वाढली आहे.

Silver Investment : सोनं विसरा! चांदीमुळे गुंतवणुकदार मालामाल, 1 लाखांच्या गुंतवणुकीतून मिळाले इतके लाख...

नक्की वाचा - Silver Investment : सोनं विसरा! चांदीमुळे गुंतवणुकदार मालामाल, 1 लाखांच्या गुंतवणुकीतून मिळाले इतके लाख...

इंडस्ट्रीकडून मागणी....

सद्यस्थितीत चांदी केवळ दागिन्यांपुरती सीमित नसून सोलर पॅनल, इलेट्रिक वाहन, मेडिकल उपकरणांमुळे चांदीचा वापर केला जातो. आताही ५० ते ६० टक्के चांदीची मागणी इंडस्ट्रीतून येते. विशेष म्हणजे अनेक सेक्टरमध्ये चांदीला कोणताही स्वस्त पर्याय नाही. विशेषत: ऊर्जा आणि इलेट्रॉनिक्समध्ये याचा वापर आवश्यक आहे. जसं जसं जग हरित ऊर्जेच्या दिशेने जात आहे, तसं तसं चांदीची मागणी वाढत आहे. 


पुढील काही दिवसात चांदीची किंमत कमी होईल? 

सद्यस्थितीतील चांदीची वाढ केवळ उत्साहाच्या भरात नाही. तर यामागे मजबूत कारणं आहेत. वाढतं सरकारी कर्ज, महागाईची चिंता आणि रियल एसेट्सच्या मागणीमुळे चांदीला आधार मिळाला होता. चांदीच्या किमतीतील चढ-उतार हा सोन्याहून अधिक गतीने होत आहे. त्याामुळे याच्या किमतीतील जलद वाढीनंतर थोडी घसरण किंवा स्थिरता येऊ शकते. ज्याला करेक्शन म्हटलं जाईल.  चांदीचा भाव प्रति औंस ४८ ते ७० डॉलर्सच्या आत राहू शकतो. जर व्याजदर कमी झाला किंवा औद्योगिक मागणी आणखी मजबूत झाली तर चांदीच्या किमती पुन्हा ७५ डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com