
राजस्थानच्या बिकानेरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडूचा सरावादरम्यान मृत्यू झाला आहे. पॉवरलिफ्टिंग खेळाडू आणि सुवर्णपदक विजेती यश्तिका आचार्य जीममध्ये सराव करताना अपघात घडला. 270 किलो वजनाचा रॉड तिच्या अंगावर पडल्याने तिची मान मोडली. घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा डॉक्टरांनी मृत घोषित केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीकानेरच्या आचार्य चौक परिसरात राहणाऱ्या ऐश्वर्या आचार्य यांची मुलगी यश्तिका पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होती. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास, यश्तिका नेहमीप्रमाणे बडा गणेश जी मंदिराजवळील एका खाजगी जीममध्ये सराव करत होती. या दरम्यान, प्रशिक्षकाच्या उपस्थितीत, तिने 270 किलो वजनाचा स्क्वॉट करण्याचा प्रयत्न केला.
(वाचा- Best bus fare hike : बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार)
खौफनाक VIDEO..
— NDTV India (@ndtvindia) February 19, 2025
बीकानेर में 17 वर्षीय वेटलिफ्टर यष्टिका आचार्य की मौत, ट्रेनिंग के दौरान उठा रही थी 270 किलो वजन#Bikaner । #Rajasthan pic.twitter.com/2L9UAb1Jeu
यादरम्यान यश्तिकाचा तोल गेला आणि तिच्या हातातून रॉड निसटला. मात्र 270 वजनाचा तो रॉड तिच्या मानेवर पडला. प्रशिक्षक आणि जवळ उपस्थित असलेल्या इतर खेळाडूंनी तिच्या हातातून रॉड काढला. पण तोपर्यंत यश्तिका बेशुद्ध झाली होती. काही सेकंदात ही सर्व घटना घडली.
प्रशिक्षकाने सीपीआर देऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यष्टिका आचार्य शुद्धीवर आली नाही. त्यानंतर लगेचच तिला पीबीएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी यश्तिकाला मृत घोषित केले.
( नक्की वाचा : Champions Trophy : 29 वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेचा पहिल्याच दिवशी फ्लॉप शो, पाकिस्तानात काय चाललंय? )
राजस्थान राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या अलवर येथील 29 व्या राजस्थान राज्य सब-ज्युनियर आणि सिनियर पुरुष आणि महिला सुसज्ज बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये यश्तिकाने अलीकडेच प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय गोव्यात झालेल्या 33 व्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत यश्तिकाने सुवर्णपदक आणि क्लासिक प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. यश्तीकाने तिच्या छोट्या कारकिर्दीत आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं होतं. तिच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रालर शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world