कधी होते मजूर, आता लॉटरी किंग... कोण आहेत सँटियागो मार्टिन? ज्यांच्या कंपनीने खरेदी केले सर्वाधिक इलेक्टोरल बाँड्स

2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) तपास करण्यात आलेल्या फ्यूचर गेमिंग कंपनीने १३५० कोटींचे सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. सँटियागो मार्टिन या फ्यूचर गेमिंग कंपनीचे मालक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सँटियागो मार्टिन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंबंधित (Electoral Bond) माहिती सार्वजनिक केली आहे. निवडणूक आयोगाने भारतीय स्टेट बँकेकडून (SBI) मिळालेली आकडेवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. देशातील विविध कंपन्यांपासून काहींनी वैयक्तिक स्वरुपात 2019 ते आतापर्यंत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना 1,27,69,08,93,000 रुपये दान केले आहेत. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना दान देणाऱ्या माहितीनुसार, फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्विसेज नावाची कंपनी निवडणूक रोखेंच्या खरेदीत प्रामुख्याने दिसून येत आहेत. 

या कंपनीने खरेदी केले सर्वाधिक बाँड्स..
2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) तपास करण्यात आलेल्या फ्यूचर गेमिंग कंपनीने 1350 कोटींचे सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. सँटियागो मार्टिन या फ्यूचर गेमिंग कंपनीचे मालक आहे.

सँटियागो यांना लॉटरी किंग या नावानेही ओळखले जाते.  सँटियागो एकेकाळी म्यानमारमध्ये मजुरीचं काम करीत होते, मात्र आज ते लॉटरी किंग या नावाने ओळखले जातात. यांच्या कंपनीने राजकीय पक्षांना सर्वांधिक दान दिलं आहे. 

सँटियागो मार्टिन कोण आहेत?
मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, सँटियागो मार्टिन हे मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. कमी वयात त्यांनी लॉटरी क्षेत्रात आपला प्रवास सुरू केला. मार्टिन यांना भारताचे लॉटरी किंग म्हणूनही ओळखले जाते. लॉटरीच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी म्यानमारमधील यांगूनमध्ये मजुरीचं काम केलं होतं. त्यानंतर ते भारतात परतले. 

एका वर्षात सर्वाधिक टॅक्स देणारी व्यक्ती
सँटियागो मार्टिन यांना 2004 मध्ये फाऊंडेशन फॉर एक्सीलेन्स इन बिजनेस प्रॅक्टिस, जिनेवाकडून व्यवसाय क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीसाठी सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. इतकच नाही तर ते भारतातील सर्वाधिक कर देणारी व्यक्ती आहे. त्यांनी एक वर्षात 1 अरबपरर्यंत कर परतावा दिला आहे. लॉटरी तिकीटांव्यतिरिक्त सँटियागो मार्टिनच्या अध्यक्षतेखाली समूह रिअल इस्टेट, बांधकामापासून ते हॉस्पिटॅलिटी, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान तसेच बांधकाम साहित्य आणि इतर अनेक सेवा पुरवतात. सँटियागो मार्टिन हे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राहिले आहेत. निवडणूक रोखेंच्या आकड्यांनुसार, 2019 ते 2024 दरम्यान फ्यूचर गेमिंगने 1368 कोटींचं दान दिलं आहे.  

Advertisement