भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय इतिहासात केरळमध्ये आतापर्यंत एकही खासदार निवडून आणला नव्हता. केरळमध्ये निवडणूका लढवल्या जात होता. पण भाजपला विजयाची चव काही चाखता येत नव्हीत. सतत पराभव पदरात पडत होता. पण त्याने भाजप खचली नाही. एकामागून एक निवडणुका लढत गेले. पराभव पदरात पडत गेले. मात्र 2024 च्या निवडणुकीत अखेर केरळमध्ये कमळ फुलले. भाजपला पहिल्या विजयाचा आनंद लुटता आला. अनेक वर्षाचे श्रम कामी आले. केरळच्या त्रिशुर लोकसभा मतदार संघातून अभिनेते सुरेश गोपी यांनी विजयाचा झेंडा रोवला. त्यांच्या या विजयाने केरळमध्ये भाजपचे खाते उघडले. त्याचे बक्षिसही त्यांना पक्षाने दिले आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा सामेवश करण्यात आला.
कोण आहेत सुरेश गोपी?
सुरेश गोपी हे केरळमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी 250 पेक्षा जास्त मल्याळी चित्रपटात काम केले आहे. गेल्या 32 वर्षापासून ते चित्रपट सृष्टीत आहे. त्यांना 1998 ला कलियाट्टम मधील अभिनयासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तर केरळ राज्य सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 1958 मध्ये केरळच्या अलप्पुझामध्ये त्यांचा जन्म झाला. मोठ्या पडद्या बरोबरच त्यांनी छोट्या पडद्यावरही काम केले आहे. केरळ चित्रपट सृष्टीत त्यांना दबदबा आहे. अभिनेत्या बरोबरच ते एक गायकही आहे. 18 कोटींची त्यांची संपत्ती असून त्यांच्यावर 1 कोटीचे कर्जही आहे. इंग्रजी लिटरेचरमध्ये त्यांनी मास्टर्स केले आहे. 1990 साली त्यांनी राधिका नायर यांच्या बरोबर विवाह केला. या दोघांना पाच मुले आहेत.
राजकारणात केले एन्ट्री
सुरेश गोपी 2016 साली भारतीय जनता पक्षात सहभागी झाले. त्यानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत करण्यात आली. पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना त्रिशुर लोकसभेतून भाजपची उमेदवारी देण्यात आली. मात्र काँग्रेस उमेदवार टी.एन प्रथापन यांनी त्यांचा मोठा पराभव केला. सुरेश गोपी जवळपास 1 लाख 21हजार 267 मतांनी पराभूत झाले. एवढेच नाही तर ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र त्यांनी हार मानली नाही. ते मतदार संघात सतत काम करत राहीले. जनतेत त्यांनी संपर्क वाढवला.
अखेर कमळ केरळात फुलले
राज्यसभेचे खासदार म्हणून ते काम करत होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांना पुन्हा एकदा भाजपने मैदानात उतरवले. गोपी यांनी त्रिशुर लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली. त्यांची लढत काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षा बरोबर होती. ही लढत तशी सोपी नव्हती. या मतदार संघात काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने आलटून पालटून विजय मिळवला होता. काँग्रेसने के. मुरलीधरन तर कम्युनिस्ट पक्षाने व्ही एस सुनिलकुमार यांना मैदानात उतरवले होते. तिरंगी झालेल्या या लढतीत अखेर सुरेश गोपी यांनी विजय मिळवला. कम्युनिस्ट पक्षाच्या सुनिलकुमार यांचा त्यांनी 74 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world