जाहिरात

Share Market Crash : शेअर बाजारात घसरण का होत आहे? काय आहेत कारणे?

Share market News : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एकट्या जानेवारी महिन्यात 64 हजार कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. 24 जानेवारीपर्यंतची ही आकडेवारी आहे.

Share Market Crash : शेअर बाजारात घसरण का होत आहे? काय आहेत कारणे?

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 च्या आधी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जानेवारी महिन्यात शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातील देखील ही मालिका कायम आहे. गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचा नुकसान या पडझडीमळे होते आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने बाजारात घसरण होता. 

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एकट्या जानेवारी महिन्यात 64 हजार कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. 24 जानेवारीपर्यंतची ही आकडेवारी आहे. रुपयाची घसरण यामागचे प्रमुख कारण आहे. कारण हे गुंतवणूकदार गुंतवणूक डॉलरमध्ये करतात, मात्र त्याचा परतावा घेत असताना त्यांना रुपयांत तो मिळतो जो त्यांना डॉलरमध्ये बदलून घ्यावा लागतो. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्याने गुंतवणूकदारांच्या फायद्यावर परिणाम होत आहे.

(नक्की वाचा-  Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार आपटला, Sensex जवळपास 600 अंकांनी खाली)

कंपन्यांचा तिमाही निकाल

भारतीय कंपन्यांचा नफा वाढत नाही. मंदीचे सावट असल्याने मालाला उठाव नाही. त्यामुळे विक्री होत नाही. मागणी नसल्याने पुरवठा कमी होत आहे. पुरवठा कमी झाल्याने उत्पादन कपात करावी लागत आहे. पुरवठा होत नसल्याने त्याचा वस्तूंच्या किंमतींवरही परिणाम होत आहे. बहुतांश कंपन्यांनी डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सगळ्यांचे मिळून यंदाच्या वर्षी कंपन्यांचा नफा 8 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावर्षी हा नफा 15 टक्क्यांच्या आसपास होता. 

भारतीय कंपन्यांचे शेअर महाग

परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय कंपन्यांचे शेअर महाग वाटू लागले. अमेरिकेत गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळेल असं गुंतवणूकदारांना वाटतंय. ट्रम्प यांनी निर्बंध लादल्यास भारताला त्याचा फटका बसेल असा अंदाज आहे. खासकरून आयटी कंपन्यांना फटका बसेल असा अंदाज आहे.

(नक्की वाचा-  PPF Investment : बँकांऐवजी PPF मधील गुंतवणूक कशी ठरेल फायदेशीर? हे 5 मुद्दे समजून घ्या)

ट्रम्प यांचं धोरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांनाचाही शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे गुंतवणूकदार जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहून सावध पावले उचलत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com