जाहिरात

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार आपटला, Sensex जवळपास 600 अंकांनी खाली

Stock Market Updates: आठवड्याच्या सुरुवातीला आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 490.03 अंकांनी घसरून 75,700.43 अंकांवर पोहोचला.

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार आपटला, Sensex जवळपास 600 अंकांनी खाली
Stock Market News Updates

शेअर बाजारातील पडझडीची मालिका सुरुच आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 490.03 अंकांनी घसरून 75,700.43 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी 152.05 अंकांच्या घसरणीसह 22,940.15 वर उघडला. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 च्या आधी बाजारात गोंधळ आणि सावध वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या आठवड्यात देखील बाजाराचे प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले होते. सेन्सेक्स 329 अंकांनी घसरला आणि 76,190 वर बंद झाला होता. तर निफ्टीही 113 अंकांनी घसरला आणि 23,092 वर बंद झाला.

(नक्की वाचा-  PPF Investment : बँकांऐवजी PPF मधील गुंतवणूक कशी ठरेल फायदेशीर? हे 5 मुद्दे समजून घ्या)

मोठ्या घसरणीसह निफ्टी 50 त्याच्या ऑल टाईम हायवरून सुमारे 13 टक्क्यांनी घसरला आहे. तर बीएसई सेन्सेक्स देखील त्याच्या ऑल टाईम हायवरून सुमारे 12 टक्क्यांनी घसरत आहे. अर्थसंकल्प जसजसा जवळ येईल तसतसा बाजाराचा मूड अस्थिर होऊ शकतो. 

(नक्की वाचा-  Bank Account : सॅलरी अकाऊंट आणि सेव्हिंग्स अकाऊंटमध्ये नेमका फरक काय?)

जागतिक संकेत आणि कंपन्याच्या तिमाही निकालांचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टी50 वर दिसत आहे. या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात आर्थिक धोरणे आणि आर्थिक पावले यावर गुंतवणूकदार विशेष लक्ष देतील. याचा थेट परिणाम बाजारावर होईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com