धक्कादायक! संबंधांनंतर गर्लफ्रेंडला होऊ लागला रक्तस्राव, बॉयफ्रेंड गुगलवर शोधत राहिला उपाय

तरुणीला वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित होते. तसं झालं असतं कदाचित तरुणीचा जीव वाचला असता. परंतु प्रियकराने तिला रुग्णालयात नेण्याऐवजी रक्तस्त्राव थांबवण्याचे मार्ग ऑनलाइन शोधत राहिला.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काही वेळातच 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 सप्टेंबर रोजी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शारीरिक संबंधानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला. मात्र तिला रुग्णालयात नेण्याऐवजी प्रियकर रक्तस्त्राव थांबवण्याचे मार्ग ऑनलाइन शोधत राहिला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मेडिकल रिपोर्टनुसार, महिलेचे वजानल टिशू फाटले होते. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तिचा प्रियकर एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. मात्र काही वेळातच तरुणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. ज्यामुळे दोघेही खूप घाबरले. 

(नक्की वाचा- Bus Fire : टायर फुटल्याने स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू)

यावेळी तरुणीला वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित होते. तसं झालं असतं कदाचित तरुणीचा जीव वाचला असता. परंतु प्रियकराने तिला रुग्णालयात नेण्याऐवजी रक्तस्त्राव थांबवण्याचे मार्ग ऑनलाइन शोधत राहिला.

(नक्की वाचा-  ऑनलाईन ऑर्डर, मग मर्डर! दीड लाखांच्या iPhone साठी डिलिव्हरी बॉयला संपवलं)

तरुणीने कपड्याच्या साहाय्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. सततच्या रक्तस्त्रामुळे तरुणी काही वेळाने बेशुद्ध झाली. यानंतर घाबरलेल्या तरुणाने हॉटेलमध्ये आपल्या एका मित्राला बोलावले आणि त्यानंतर तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले.

Advertisement

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले. प्रियकराने तरुणीच्या कुटुंबीयांना फोन करून बोलावून घेतलं. मात्र ते रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला आहे. तर तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Topics mentioned in this article