थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये स्कूल बस आग लागून झालेल्या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. स्थानिक अधिकारी आणि बचाव पथकाने याबाबतची माहिती दिली आहे.
थांयलंडचे परिवहन मंत्री सूरिया जुंगरुंगरुएंगकित यांनी माहिती दिली की, बसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असे 44 जण प्रवास करत होते. बँकॉकच्या उत्तर उपनगरातील पथुम थानी प्रांतात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
(नक्की वाचा- ऑनलाईन ऑर्डर, मग मर्डर! दीड लाखांच्या iPhone साठी डिलिव्हरी बॉयला संपवलं)
A tragic fire engulfed a school bus from Wat Khao Phraya Sangkharam School near #Bangkok on October 1, 2024, killing over 20 children
— True Crime Updates (@TrueCrimeUpdat) October 1, 2024
The bus, returning to #UthaiThani, caught fire at 12:38pm in #PathumThani
Out of 44 aboard, mostly 9-10-year-olds, at least 19 survived with… pic.twitter.com/Zc8u7sEwzm
बसचा टायर फुटला आणि त्यानंतर बस दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर बसला आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बस शाळेच्या सहलीवरून परतत होती. बसमध्ये 3 ते 15 वर्षे वयोगटातील मुले होती. याशिवाय त्याच्यासोबत 5 शिक्षकही प्रवास करत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गृहमंत्री अनुतिन चार्नविराकुल यांनी सांगितलं की, अपघातातील मृतांचा संख्या अद्याप समोर आलेली नाही. सध्या मृतांच्या आकड्याबाबत योग्य माहिती देणे शक्य नाही. मात्र गाडीतील प्रवाशांची संख्या आणि बचावलेल्या प्रवाशांची संख्या याआधारे 25 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
(नक्की वाचा- Pune News : हत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?)
बसला आग लागल्याने अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगाच्या ज्वाळा आणि धुराचे लोट यामध्ये दिसत आहेत. विद्यार्थ्यांचं वय आणि या घटनेसंबंधीची इतर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world