सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातल्या कानाकोपऱ्यात काय काय होत आहे याची माहिती मिळते. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची धुम आहे. तो व्हिडीओ आहे फ्रिज शिवाय पाणी थंड करण्याचा. पाणी थंड करण्यासाठी ना फ्रिजची गरज आहे ना वीजेची गरज आहे. या व्हीडिओला इंस्टाग्रामवर एक मिलीयन पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. दिव्या सिन्हा (@divyasinha266) यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिन्हा यांनी हा व्हीडिओ शेअर करताना गावातले काही मजेशीर आणि सोपे देशी जुगाड आपल्याला दाखवणार असल्याचे म्हटले आहे. शहरात पाणी थंड करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. पण एका गावात साध्या प्लास्टीकच्या बाटलीत पाणी थंडगार केले जाते. त्यासाठी देसी जुगाड केला गेलाय. एका भिजलेल्या कपड्यात ती पाण्याची बाटली गुंडाळली जाते. त्यानंतर ती झाडाला उलटी टांगली जाते. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर बाटलीतले पाणी आपोआप थंड होते. पाण्याच्या बाटलीला ओल्या कपड्यात गुंडाळून हवेच्या संपर्कात ठेवल्याने ते पाणी थंड होते.
हेही वाचा - पुण्यात घृणास्पद कृत्य! पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं; चावी हरवल्याने किळसवाणा प्रकार उघड
ओला केलेल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पीभवन होते. शिवाय पाण्याच्या बाटलीच्या आत असलेल्या गरम पणालाही तो खेचून घेतो. या व्हिडीओतली महीला गावातले लोक हुशार असतात असं सांगत, या देशी जुगाडचे श्रेय आपल्या छोट्या भावाला देते. पाणी थंड करण्याच्या या जुगाडाने अनेक लोक प्रभावीत झाले आहेत. त्यावर अनेकांनी प्रतिक्रीयाही दिल्या आहेत.
हेही वाचा - शारीरिक सुखाच्या खेळात बॉयफ्रेंडनं दाबला गर्लफ्रेंडचा गळा... त्यानंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का
हा व्हिडीओ पाहील्यानंतर एकाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणतो एकदम छान दिली. तुम्ही किती सहजतने एखाद्या समस्येचे समाधान शोधले आहे. गावातले लोक खरोखरच हुशार असतात. आणखी एकाने सांगितले आहे की मी दिल्लीत राहात होतो. त्यावेळी पाणी थंड करण्यासाठी हाच जुगाड करत होतो. एक जण असं लिहीतो की मी कधीच गावात राहीलो नाही. पण या गोष्टी पाहील्यानंतर खुप आनंद वाटतो.
पाहा Video: