'तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली', फेक कॉलने घेतला महिलेचा जीव

मालती वर्मा असं मृत महिलेचं नाव आहे. त्यांची मुलगी देखील अशा कोणत्याही सेक्स रॅकेटमध्ये फसली नव्हती. मात्र बदनामी आणि भीतीपोटी मालती यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins

ऑनलाईन फसवणुकीचा एका धक्कादायक प्रकार आग्र्यातून समोर आला आहे. ऑनलाईन ठगांच्या फेक कॉलमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हॉट्सअॅप कॉलद्वारे पोलीस असल्याचं सांगून 'तुमची मुलगी 'सेक्स रॅकेट'मध्ये फसली आहे. तिला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध केस दाखल करायची नसेल तर 1 लाख रुपये पाठवा', असं ऑनलाईन ठगांनी महिलेला सांगितलं. यानंतर संबंधित महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

मालती वर्मा असं मृत महिलेचं नाव आहे. त्यांची मुलगी देखील अशा कोणत्याही सेक्स रॅकेटमध्ये फसली नव्हती. मात्र बदनामी आणि भीतीपोटी मालती यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मालती वर्मा (58 वर्ष) या कन्या ज्युनियर हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. मुलाचं लग्न झालं आहे. तर दोन मुली देखील आहेत. 30 सप्टेंबर रोजी मालकी वर्गात मुलांना शिकवत होत्या. त्यावेळी त्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर त्यांना एक फोन आला. ज्या नंबरवरुन फोटो आला त्याचा प्रोफाईल फोटोवर पोलिसांची वर्दी होती. फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीने सांगितलं की, तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे. तिच्याविरुद्ध केस फाईल करायची नसेल तर या नंबरवर 1 लाख रुपये पाठवा.

(नक्की वाचा- मित्राबरोबर घाटात फिरायला गेली अन् घात झाला, पुण्यात 21 वर्षीय तरुणी बरोबर भयंकर घडलं)

सगळा प्रकार ऐकून मालती यांना मोठा धक्का बसला. मानसिक तणावातून त्यांची तब्येत बिघडली. एकदा नाहीतर अनेकदा त्यांना हा कॉल आला. त्यामुळे त्या 'डिजिटल अरेस्ट'च्या शिकार झाल्या. मुलीबाबत असं ऐकून त्या खचल्या. त्यांनी घडला प्रकार मुलाला सांगितला. मुलाने तातडीने बहिणाला फोन करुन विचारणा केला. मात्र असं काहीही झालं नसल्याने तिने सांगितलं. मुलाने पुन्हा मालती यांना फोन करुन हे सगळं खोटं असल्याचं सांगितलं. मात्र मालती या धक्क्यातून सावरु शकल्या नाहीत.

कसंबसं त्या घरी आल्या. त्यांना छातीत दुखत असल्याची तक्रार घरच्यांकडे केली. त्यावेळी त्यांना जवळील रुग्णालयात नेलं. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना याप्रकरणी सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. 

(नक्की वाचा -  शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे... )

आग्रा लोहा मंडीचे एसीपी मयंक तिवारी यांनी सांगितलं की, 'डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अशा घटना सातत्याने वाढत आहेत. नागरिकांनी जागरूक राहून अशा घटनांना तोंड दिले पाहिजे. अशा फसवणूक करणाऱ्यांच्या नवनवीन पद्धतींपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल जगात सतर्क राहायला हवे. लक्षात ठेवा, फसवणुकीची प्रत्येक योजना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा आपण त्याला बळी पडतो. म्हणून डिजिटल सुरक्षिततेला आपले प्राधान्य द्या. सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या लढ्यात तुमची दक्षता हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीला गैरसमजाचा बळी बनवून भीती आणि दहशतीमध्ये टाकलं जात. त्या व्यक्तीकडून या भीतीच्या आधारे पैसे मागितले जातात. म्हणजेच त्याला सायबर गुन्ह्याचा बळी बनवणे जाते. अशाप्रकारे डिजिटल गुन्हेगार डिजिटल अरेस्ट करतात.