जाहिरात

Year Ender 2024 : देशाच्या 'या' लेकींनी रचला इतिहास, 2024 गाजवलं!

2024 या वर्षात भारताला अनेक क्षेत्रात मोठं यश मिळालं. त्यात देशभरातील महिलांचा मोठा वाटा आहे.

Year Ender 2024 : देशाच्या 'या' लेकींनी रचला इतिहास, 2024 गाजवलं!
मुंबई:

2024 या वर्षात भारताला अनेक क्षेत्रात मोठं यश मिळालं. देशातील अनेक महिला खेळाडूंना जागतिक स्तरावर गौरविण्यात आलं आहे. 2024 मध्ये भारताला टी20 क्रिकेट वर्ल्डकपही मिळालं आणि दुसरीकडे ऑलिम्पिक गेम्समध्ये देशातील तरुणांनी झेंडा गाडला. 2024 या वर्षात ज्यांनी जगाच्या इतिहासात आपलं नाव नोंदलवलं त्यात नेमबाज मनू भाकरपासून ते छोट्याशा शहरातून कान्सपर्यंत पोहोचणारी fashion influencers नैन्सी त्याची हिच्याही नावाचा समावेश आहे. 

Video : इतकं मारलं की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही; 'रणरागिणी'चं रुप पाहून भले भले अवाक् 

नक्की वाचा - Video : इतकं मारलं की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही; 'रणरागिणी'चं रुप पाहून भले भले अवाक् 

मनु भाकर...
पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताने मोठी बाजी मारली आणि अनेक पदकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मनु भाकर पहिली ही एकमेव खेळाडू आहे जी एकाच स्पर्धेत दोन पदकं मिळविणारी आहे. 22 वर्षांच्या मनुने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये ब्राँझ जिंकलं. तर 25 मीटर एअर पिस्टलमध्ये साथीदार सरबजोत सिंहसह ब्राँझ पदक जिंकलं होतं. 

अवनी लेखरा...
भारतीय रायफल शूटर अवनी लेखराने पॅरालम्पिक गेम 2024 मध्ये गोल्ड पदक जिंकून इतिहास रचला होता. पॅरिस पॅरालिम्पिक गेम 2024 मध्ये अवनी लेखराने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये दोन पदकं जिंकली होती.  यात अवनीने एक ब्रॉन्झ पदक आपल्या नावावर कोरलं. अवनीला एकाच इव्हेंटमध्ये दोन पदकं मिळाली आहेत. 

नॅन्सी त्यागी...
उत्तर प्रदेशातील बागपत-बडौतमध्ये राहणारी fashion influencers नॅन्सी त्यागी थोड्याच अवधीत देशभरातील लोकांपर्यंत पोहोचली. नॅन्सी त्यागी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024  मध्ये डेब्यू करीत जगभरात मोठं नाव कमावलं. नॅन्सीने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील रेड कार्पेटवर स्वत: तयार केलेला एक ड्रेस घातला होता. सोनम कपूरसह अनेक अभिनेत्रींनी नॅन्सीच्या कपड्यांचं कौतुक केलं होतं. नॅन्सीने दावा केला आहे की, तिचं नाव फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 डिजिटल स्टार्स 2024 च्या लिस्टमध्ये आलं आहे. नॅन्सी त्यागी दिल्लीच्या गांधीनगर मार्केटमध्ये कपडे खरेदी करून ट्रेंडी ड्रेस शिवते. 

गोमांस खाऊ घातलं, मुस्लीम नाव दिलं, Mrs. India Galaxy 2024 रिनीमा बोरानं सांगितला 'लव्ह जिहाद'चा अनुभव

Nov 09, 2024 20:36 pm IST

गोमांस खाऊ घातलं, मुस्लीम नाव दिलं, Mrs. India Galaxy 2024 रिनीमा बोरानं सांगितला 'लव्ह जिहाद'चा अनुभव

मोहना सिंह
स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग यांनी हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट ठरली असून तिने एक इतिहास रचला आहे. तिच्याकडे गुजरातच्या नलियामधील नंबर 18 फ्लाइंग बुलेट्स स्क्वाड्रनची जबाबदारी सोपवली आहे. मोहना सिंह जोधपूरमध्ये तरंग शक्ती अभ्यासाचा भाग होती. येथे तिन्ही सैन्याच्या तिन्ही उपप्रमुखांसह ऐतिहासिक उड्डाणाचा अनुभव घेतला होता. भारतीय वायुसेनेत फायटर पायलट बनलेल्या तीन महिलांच्या पहिल्या गटात मोहना सिंह देखील होत्या.

साधना सक्सेना...
वर्ष 2024 मध्ये, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्या जनरल हॉस्पिटल सर्व्हिसेस (आर्म्ड फोर्सेस) च्या डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि वेस्टर्न एअर कमांडच्या प्रिन्सिपल मेडिकल ऑफिसर बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. लेफ्टनंट जनरल नायर यांच्याजवळ फॅमिली मेडिसीनमध्ये पदव्युत्तर आणि मेटरनल अँड चाइल्ड हेल्थमध्ये डिप्लोमासह अनेक पदव्या आहेत.

विनेश फोगाट...
पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.  50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं वजन अवघ्या 100 ग्रॅमने जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे विनेश कोणताच सामना खेळू शकली नाही. ऑलिम्पिकमध्ये कोणतंही पदक मिळालं नसलं तरीही  ती भारतीयांसाठी विजेती ठरली. त्यानंतर अवघ्या महिनाभरात विनेशने राजकारणात नशीब आजमावलं. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतही जुलाना मतदारसंघातून तिने निवडणूक लढवली आणि जिंकलीही. सातव्या टप्प्यात भाजपचे उमेदवार योगेश बैरागी यांना मागे टाकत विनेश फोगाट पहिल्या क्रमांकावर पोहोचली आणि शेवटी विजयी झाली. विनेश फोगाटला 65,080 मतं मिळाली असून ती 6015 मतांनी जिंकली आहे. योगेश बैरागी यांना 59,065 मतं मिळाली आहेत. याशिवाय सुरेंद्र लाठर यांना 10,158 मंत मिळाली. त्यानुसार विनेश फोगाटने 6015 मतांनी विजयी झाले आहेत. 

पायल कपाडिया...
पायल यांचा जन्म मुंबई शहरातीलच आहे. पण त्यांनी आंध्र प्रदेश आणि मुंबईमध्येही शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पायलने फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टिट्युटमधून दिग्दर्शनाचे धडे घेतले. 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात पायल यांची 'ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट' या भारतीय सिनेमाची जादू पाहायला मिळाली. पायल कपाडिया दिग्दर्शित या फीचर सिनेमाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार पटकावला. पाल्मे डी'ओर पुरस्कारानंतर 'ग्रँड प्रिक्स' हा फिल्म फेस्टिव्हलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. पायल कपाडिया दिग्दर्शित या सिनेमामध्ये कनी कुश्रुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृधू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पायल कपाडिया यांच्या सिनेमाचे गुरुवारी (23 मे 2024) रात्री स्क्रीनिंग करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस सिनेमास आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. एखाद्या भारतीय महिला दिग्दर्शकाचा सिनेमा मुख्य स्पर्धेत पोहोचण्याची 30 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे. ज्यावेळेस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचे  स्क्रीनिंग करण्यात आले होते, त्यावेळेस उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून सिनेमासह कलाकारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. तब्बल आठ मिनिटं टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. 

किरण राव (लापता लेडिज)...
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) चित्रपटाची यंदाच्या वर्षी प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारांमध्ये (Oscar Award) भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडण्यात आली होती. विशेष म्हणजे 'लापता लेडीज'ने रणबीर कपूरचा एनिमल, मल्यालम चित्रपट आट्टम आणि पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन एड लाइट सह 29 चित्रपटांना मागे टाकलं होतं. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने या चित्रपटाला भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करमध्ये पाठवलं होतं. या चित्रपटाचं देशभरातून मोठं कौतुक करण्यात आलं. सुरुवातीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही. मात्र वर्ड ऑफ माऊथ आणि चांगल्या प्रतिक्रियांमुळे हळूहळू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोर धरला. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 'लापता लेडीज' बॉक्स ऑफिसवर एकूण 17.31 कोटींची कमाई करू शकला. 

मात्र काही टप्प्यांनंतर लापता लेडिज ऑस्करमधून बाहेर पडला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com