
'येशु येशु..' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला स्वयंघोषित पादरी बिजंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहाली सत्र न्यायालयाने 2018 च्या बलात्कार प्रकरणात बिजंदर सिंगला ही शिक्षा सुनावली आहे. कलम 376 (बलात्कार), 323 आणि 506 (धमकी) या कलमान्वये बिजंदरला न्यायालयाने दोषी ठरवलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका 22 वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या आधारे बिजंदर सिंगविरोधात 28 फेब्रुवारी रोजी जीरकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी निकालाच्या दिवशा न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नक्की वाचा - Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एका व्हायरल झाला होता. ज्यात बिजंदर सिंग एका महिलेला कानशिलात मारताना आणि वाद घालताना दिसत आहे. मोहाली पोलिसांनी 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
नक्की वाचा- Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले
आम्ही सात वर्ष संघर्ष केला
न्यायालयाच्या निकालानंतर पीडितेच्या पतीने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "आम्ही या केससाठी सात वर्ष संघर्ष केला. त्याने न्यायालयाला भरकटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान न्यायालयाचा आदेश झुगारुन तो अनेकदा परदेशात गेला होता. माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आली, आमच्यावर हल्ला करण्यात आला, मी सहा महिने जेलमध्ये घालवले. त्यानंतर आम्ही बिजंदरला धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता. आम्ही न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो"
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world