Sonakshi Sinha Mosque Video : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.हे कपल नेहमी कुठेतरी फिरायला जातात आणि फोटो-व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करतात.सोनाक्षीने तिचा व्लॉगही सुरु केला आहे. सोनाक्षीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती मशिदीत जाण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी आणि जहीर मशिदीत गेले होते. त्यानंतर त्यांना खूप ट्रोल केलं गेलं. या व्लॉगद्वारे जहीरने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल नुकतेच अबू धाबीला गेले होते.हे दोघे एका प्रमोशनल ट्रिपसाठी अबू धाबीला गेले होते. या ट्रिपचा त्यांनी व्लॉग शेअर केला आहे.ज्यात सोनाक्षी मशिदीत जाण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे.यावर जहीर ट्रोल्सना उत्तर देताना म्हणतो – तो सोनाक्षीला धर्मपरिवर्तन करण्यासाठी घेऊन जात नाही आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालचा मशिदीतला व्हिडीओ होतोय व्हायरल
व्लॉगमध्ये सोनाक्षी म्हणते,“आम्ही अबू धाबीमध्ये आहोत.आमची ही ट्रिप खूप मजेदार होणार आहे.अबू धाबी टुरिझमने आम्हाला शहराची सुंदरता पाहण्यासाठी बोलावले आहे.त्यांनी आमच्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्यांचा पहिला थांबा आहे शेख जायद ग्रँड मशिद. सोनाक्षी पुढे म्हणाली,“मी खूप उत्सुक आहे कारण ही पहिली वेळ असेल जेव्हा मी मशिदीत आत जाणार आहे.
नक्की वाचा >> सलमान खान रात्री किती दारू पितो? पहाटे 4 वाजता उठून काय करतो? मीका सिंगने भाईजानची सर्व लाईफस्टाईलच सांगितली
मी मंदिर आणि चर्चला गेले आहे पण मशिदीत कधी गेले नाही.त्यानंतर जहीर म्हणतो,मी तिला धर्मपरिवर्तनासाठी घेऊन जात नाही आहे.आम्ही ती मशिद पाहायला जात आहोत कारण ती खूप सुंदर आहे.सोनाक्षी आणि जहीरचा हा व्लॉग जोरदार व्हायरल होत आहे.त्यांनी मजेशीर अंदाजात ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नक्की वाचा >> दिल्ली स्फोट प्रकरणात पुणे ATS ची धडक कारवाई! सोलापूरात 'त्या' आयटी इंजिनिअरकडे सापडले खळबळजनक पुरावे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world