संत्री ते सफरचंद... रिकाम्या पोटी चुकनही खाऊ नका हे 6 फळं, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Healthy Tips : काही फळं चुकूनही रिकाम्या पोटी (Empty Stomach) खाऊ नयेत. कारण तुम्ही ही फळं रिकाम्या पोटी खाल्ले तर तब्येत बिघडू शकते.

Advertisement
Read Time: 2 mins
H
मुंबई:

Healthy Tips: तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं असतं. तुमच्या खाण्यात पोषक तत्वं असतील तर त्याचा शरीराला फायदा होतो. उलट पोषक तत्व नसतील तर तुम्हाला निरनिराळे आजार होऊ शकतात. त्यामुळेच खाण्यात फळांचा (Fruits) आवर्जुन समावेश केला जातो. पण काही फळं चुकूनही रिकाम्या पोटी (Empty Stomach) खाऊ नयेत. कारण तुम्ही ही फळं रिकाम्या पोटी खाल्ले तर तब्येत बिघडू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोणते फळ खाऊ नयेत हे समजून घेऊया.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रिकाम्या पोटी कोणती फळं खाऊ नयेत ? ( Fruits You Should Avoid Eating On An Empty Stomach )

अननस 

अननसात ब्रोमेलेन असते त्याचा पोटाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे अननस रिकाम्या पोटी खाल्ले तर पोट खराब होऊ शकते. 

सफरचंद

रिकाम्या पोटी सफरचंद खाणे टाळावे असा सल्ला नेहमी दिला जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात नैसर्गिक अ‍ॅसिड आणि फायबर असते. त्यामुळे सफरचंद रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्लं तर अनेकांना अस्वस्थ वाटतं.

आंबे

फळांचा राजा समजला जाणारा आंबा देखील रिकाम्या पोटी खाऊ नये. आंबा खाल्ल्याने सूज येणे, गॅस आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे काही तरी खाल्ल्यानंतरच आंबा खावा. त्यामुळे पोटाचे कोणतेही त्रास होणार नाहीत. 

( नक्की वाचा : Banana benefits : 1 महिने रोज केळी खाल्ली तर दूर होतील 'हे' आजार )
 

संत्री 

रिकाम्या पोटी संत्री खाणे टाळले पाहिजे. संत्र्यासारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अपचन, छातीत जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पोटभर जेवण झाल्यानंतरच संत्री खावी.

पपई

रिकाम्या पोटी जी फळं खाऊ नयेत त्या यादीमध्ये पपईचा देखील समावेश आहे. पपई रिकाम्या पोटी खाल्ली तर पचनावर परिणाम होऊ शकतो. तसंच पोट फुगू शकतं.

पेरु

रिकाम्या पोटी पेरु देखील कधी खाऊ नका. कारण पेरुमध्ये फायबर भरपूर असते. त्यामुळे रिकाम्या पोटी पेरु खाल्ल्यानं अपचन होऊ शकतं. पेरु देखील चांगले जेवण झाल्यानंतरच खावे. त्याचा पोटावर काही परिणाम होत नाही. 

स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. हा कोणत्याही योग्य उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एनडीटीव्ही या माहितीची जबाबदारी घेत नाही. 

Topics mentioned in this article