जाहिरात

Cars In India: हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारमध्ये नेमका फरक काय? कार खरेदी करण्याआधीच जाणून घ्या सर्व डिटेल्स

Hybrid And Electric Car Difference :  हायब्रिड कार आणि इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्यै काय? दोन्ही कारमध्ये फरक काय?

Cars In India: हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारमध्ये नेमका फरक काय? कार खरेदी करण्याआधीच जाणून घ्या सर्व डिटेल्स
Hybrid Car And Electric Car
मुंबई:

Hybrid And Electric Car Difference :   :  पूर्वी जेव्हा तुम्ही कार खरेदी करायला जात होता,तेव्हा बाजारात फक्त दोन प्रकारच्या गाड्या उपलब्ध होत्या.पहिली पेट्रोल इंजिन असलेली कार आणि दुसरी डिझेल इंजिन असलेली कार. पण काळानुसार तंत्रज्ञान पुढे गेले. ऑटोमोबाईल उद्योगातही अनेक बदल झाले. आता बाजारात हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कार्सही आल्या आहेत आणि आजच्या काळात सर्वाधिक चर्चा या दोन गाड्यांबद्दलच होते. बहुतेक लोक या गाड्या खरेदी करत आहेत. दोन्ही प्रकारच्या गाड्या प्रवास स्वस्त आणि सोपा करतात. 

मात्र, दोन्हीमध्ये काही फरक आहेत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. चला, तुम्हाला सांगतो की या दोन प्रकारच्या गाड्या एकमेकांपासून कशा वेगळ्या आहेत. हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्या पर्यावरणपूरक असतात. या प्रदूषण कमी करण्यासोबतच पेट्रोलचा खर्चही कमी करतात. दोन्ही गाड्यांमध्ये काही समानता असते, पण त्यांच्यात मोठे फरकही असतात, जे त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात.

कशा चालतात इलेक्ट्रिक कार?

सर्वप्रथम इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घ्या. नंतर तुम्हाला हायब्रिड कार समजून घेणे सोपे होईल. इलेक्ट्रिक कार किंवा EV पूर्णपणे बॅटरीवर चालते. यात फक्त एक इलेक्ट्रिक मोटर असते जी कार चालवते. यात पेट्रोल किंवा डिझेल इंजिन नसते. ही कार आपल्या बॅटरीत साठवलेल्या विजेचा वापर करून मोटर चालवते, जी चाकांना शक्ती देते. या कार चालवण्यासाठी फक्त विजेची गरज असते. तुम्ही त्यांना चार्जिंग स्टेशनवर किंवा घरी चार्जरद्वारे चार्ज करू शकता.

नक्की वाचा >> पहिल्यांदाच मशिदीत गेल्यावर सोनाक्षी सिन्हाने व्हिडीओ केला शेअर,खुश झाल्यावर पती जहीर म्हणाला, धर्मपरिवर्तन...

इलेक्ट्रिक कारचे फायदे

इलेक्ट्रिक कार प्रदूषण करत नाहीत, कारण त्यात टेलपाइप एग्झॉस्ट अजिबात नसतो. त्यांचा रनिंग कॉस्ट (चालवण्याचा खर्च) पेट्रोल कारच्या तुलनेत खूप कमी असतो. प्रत्येक कारची एक ठराविक रेंज असते, म्हणजे बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्ही कार ठराविक अंतरापर्यंतच चालवू शकता. त्यानंतर तुम्हाला बॅटरी पुन्हा चार्ज करावी लागते.

हायब्रिड कारची वैशिष्ट्यै काय?

आता हायब्रिड कारबद्दल बोलूया. हायब्रिड कारमध्ये दोन प्रकारचे पॉवर सोर्स असतात – एक पेट्रोल इंजिन आणि दुसरे इलेक्ट्रिक मोटर, आणि दोन्हीचा वापर कार चालवण्यासाठी केला जातो. म्हणूनच त्यांना हायब्रिड कार म्हणतात. यात पारंपरिक पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर दिली जाते. इंजिनमध्ये पेट्रोल पंपावर पारंपरिक पद्धतीने इंधन भरले जाते. तर बॅटरी गाडी चालवताना किंवा ब्रेक लावताना रीजेनरेटिव्ह ब्रेकिंगद्वारे स्वतः चार्ज होते.

नक्की वाचा >> 4 मित्रांनी ढेकर येईपर्यंत मॅगी खाल्ली,आता भांडी कोण घासणार? Google Gemini चं उत्तर ऐकून तुम्हीही लोटपोट हसाल

हायब्रिड कार सुरू होताना आणि कमी वेगाने चालताना इलेक्ट्रिक मोटरचा वापर करतात. जेव्हा त्यांना जास्त वेगाने चालवले जाते तेव्हा पेट्रोल इंजिन आपोआप सुरू होते आणि चाकांना शक्ती देते तसेच बॅटरीलाही चार्ज करते. कार आपोआप इलेक्ट्रिकवरून पेट्रोलवर स्विच होते. यामुळे कार चालवण्याचा खर्च कमी होतो आणि मायलेज वाढते. तसेच या कार प्रदूषणही कमी करतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com