Acharya Balkrishna यांनी वाढलेल्या Uric Acid वर सांगितला उपाय, या जादुई औषधामुळे शरीर होईल डिटॉक्स

Acharya Balkrishna यांनी शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी एका खास पावडरचे सेवन करण्याचा सल्ला दिलाय. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड कमी कसे करावे?

Uric Acid Treatment: युरिक अ‍ॅसिडची समस्या आता अतिशय सामान्य झालीय, शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, हातपायांमध्ये पेटके येणे आणि हातपायांना सूज येणे अशा समस्या उद्भवतात. योग्य वेळेत या समस्येवर औषधोपचार न केल्यास संधिवात आणि किडनीशी संबंधित आजारांना आयते निमंत्रण मिळू शकते. युरिक अ‍ॅसिड हे एक टॉक्सिन आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड तयार होते. लघवीद्वारे हे टॉक्सिन शरीराबाहेर फेकले जाते. पण युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास किडनीवरील ताण वाढतो.  यामुळे किडनीच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड सांध्यामध्ये जमा होऊ लागते.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी कशी कमी करावी?  

बाजारामध्ये कित्येक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. पण नैसर्गिक पद्धतीने शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करता येऊ शकता. या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी बाबा रामदेव यांचे सहकारी आणि आयुर्वेद केंद्र पतंजली योगपीठचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी एक खास पद्धत सांगितलीय. 

Advertisement

आचार्य बालकृष्ण यांनी त्यांच्या यू-ट्युब चॅनलवरील व्हिडीओमध्ये म्हटलंय, 'युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी एका खास पावडरचे सेवन करू शकता. या पावडरमुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होईलच शिवाय सांधे देखील मजबूत होण्यास मदत मिळेल'.

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Gastric Cancer: पोटाच्या कॅन्सरची लक्षणे दिसून येत नाही, वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या माहिती)

घरच्या घरी असे तयार करा चूर्ण

  • चूर्ण तयार करण्यासाठी गोखरू, सूंठ, मेथीच्या बिया आणि अश्वगंधा आवश्यक आहे. 
  • चारही सामग्री समसमान प्रमाणात घ्या आणि मिक्सरमध्ये वाटा. 
  • युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी खास पावडर तयार झालीय.
  • हे चूर्ण सकाळी आणि संध्याकाळी खावे. 

ही पावडर खाल्ल्यास शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रणात येण्यास मदत मिळेल, असेही आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले. 

(नक्की वाचा: AC Side Effects: ACमध्ये झोपण्याचे 7 मोठे नुकसान)

पावडरमुळे कसा मिळतो फायदा

गोखरू

एनसीबीआयच्या (NCBI)रिपोर्टनुसार, गोखरू ऑक्सालेट, कॅल्शियम आणि फॉस्फेटचे उत्सर्जन कमी करते. यामुळे ब्लड युरिया नायट्रोजन (BUN), युरिक अ‍ॅसिड आणि क्रिएटिनिनची पातळी कमी होण्यास मदत मिळते. यामुळे किडनीची कार्यप्रणाली देखील सुधारते.  

सूंठ 

काही रिपोर्ट्सनुसार, सुंठामध्ये एथिल एसीटेट नावाचा घटक आहे, जे हायपरयुरिसेमिकची (उच्च युरिक अ‍ॅसिड) पातळी कमी करण्यास प्रभावी ठरू शकते.  

मेथी 

मेथीच्या बियांमुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधराते आणि युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. शिवाय सांधेदुखी आणि हातपायांनी येणारी सूजही कमी होते. 

अश्वगंधा

अश्वगंधामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्ण आहेत. यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )