
Importance of Stomach Cancer Screening In Marathi: अलिकडच्या काळामध्ये लोकांमध्ये पोटाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. 2020पासून हा चौथ्या क्रमांचा सर्वाधिक होणारा कॅन्सर असल्याची माहिती समोर आलीय. नोव्हेंबर महिन्यात लोकांमध्ये या आजाराप्रती जागरुकता निर्माण केली जाते. गॅस्ट्रिक कॅन्सर या आजारास पोटाचा कॅन्सर असेही म्हटलं जाते. या आजाराची लागण झाल्यास पोटाच्या वरील भागामध्ये वेदना होणे, सूज येणे, भूक न लागणे, उलट्या होणे, वजन कमी होणे आणि शौचातून रक्त येणे अशी लक्षणे दिसून येतात. मद्यपान, धूम्रपान, एच पायलोरी इंफेक्शन, लठ्ठपणा आणि सक्रिय नसलेल्या जीवनशैलीमुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. पोटाच्या कॅन्सरचे वेळेवर निदान झाल्यास उपचार करणे शक्य होतात. पोटाच्या कॅन्सरचे निदान करुन घेण्यासाठी आरोग्य तपासणी किती महत्त्वाची आहे हे जाणून घेऊया…
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोग्य तपासणीचे महत्त्व (Importance of Stomach Cancer Screening)
पोटाच्या कॅन्सरचे निदान करुन घेण्यासाठी कित्येक प्रकारच्या आरोग्य तपासणी करुन घेतल्या जातात. लक्षणे, आजारांची माहिती, पूर्वी केलेल्या आरोग्य तपासण्यांच्या आधारे आता कोणती तपासणी करायची हे ठरवले जाते. पोटाचा कॅन्सर शरीरामध्ये हळूहळू वाढतो, त्यामुळे वर्षानुवर्षे या आजाराची लक्षणे शरीरामध्ये दिसत नाहीत. हे धोके टाळण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, शाकाहाऱ्यांसाठी ठरेल रामबाण)
एंडोस्कोपी (Endoscopy)
एंडोस्कोपीला गॅस्ट्रोस्कोपी असेही म्हटलं जाते. एंडोस्कोपीद्वारे डॉक्टरांना पोटाचे आवरण पाहता येते. कोरिया आणि जपानसारख्या काही देशांमध्ये जेथे पोटाच्या कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त आहे तेथे या तपासणीचा आवश्यक तपासणीमध्ये समावेश करण्यात आलाय. जपानमध्ये 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी दर दोन ते तीन वर्षांनी एंडोस्कोपिक तपासणीचा सल्ला दिला जातो.
(नक्की वाचा: Weight Loss Diet: पटापट वजन कमी करण्यासाठी या पिठाचे करा सेवन, डाएटिशियनने सांगितली योग्य पद्धत)
मृत्यू दराचा धोका 30 टक्क्यांनी होऊ शकतो कमी
भारतात अद्याप एंडोस्कोपिक तपासणीशी संबंधित मोहीम सुरू करण्यात आलेली नाही. ज्या लोकांमध्ये पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो, त्यांचा जीव वाचवण्यासाठी आरोग्य तपासणीद्वारे मदत मिळू शकते. गॅस्ट्रिक पॉलीप्स, पोटातील आतड्यांशी संबंधित मेटाप्लासिया किंवा पोटाच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांची देखील तपासणी करावी. नियमित एंडोस्कोपिक स्क्रीनिंगमुळे पोटाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तीस टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
गॅस्ट्रिक कॅन्सरची लक्षणे
- भूक कमी लागणे
- पोटदुखी दर्द
- पोटाच्या भागामध्ये विशेषतः नाभीच्या वर अस्वस्थता निर्माण होणे
- खूप कमी प्रमाणात अन्नाचे सेवन करणं शक्य होणे
- अपचन किंवा छातीमध्ये जळजळ होणे
- पोटामध्ये सूज येणे किंवा पाणी जमा होणे
- शौचातून रक्त बाहेर पडणे
- अॅनिमिया
- कॅन्सर यकृतापर्यंत वाढल्यास त्वचा आणि डोळे पिवळे दिसू शकतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world