अधिक मास म्हणजे काय? काय करावे, काय टाळावे? 33 आकड्याचे विशेष महत्त्व, वाचा ज्योतिषी कुलकर्णींनी दिलेली माहिती

Adhik Maas 2026: ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी अधिक मासाचे नेमके महत्त्व काय, या काळात कोणते नियम पाळावेत, कोणते विशेष विधी करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या? याविषयी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 4 mins
"Adhik Maas 2026: अधिक मास म्हणजे काय?"

- गुरुजी श्रीकेतन कुलकर्णी

Adhik Maas 2026: हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये कालगणनेला आणि आध्यात्मिक साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक गणितातून 'अधिक मास' ही संकल्पना आकारास आली आहे. प्रसिद्ध ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण माहितीनुसार, अधिक मास हा केवळ खगोलीय बदलांचा काळ नसून मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मशुद्धी आणि ईश्वरीय कृपा प्राप्त करून घेण्याची एक उत्तम पर्वणी आहे. या महिन्याला 'पुरुषोत्तम मास' किंवा 'मलमास' असेही संबोधले जाते. ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी सांगतात की, इतर महिन्यांच्या तुलनेत या काळात केलेल्या आध्यात्मिक साधनेचे फलित कैक पटींनी अधिक मिळते. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या भक्तीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला गेला आहे.  ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी अधिक मासाचे नेमके महत्त्व काय, या काळात कोणते नियम पाळावेत, कोणते विशेष विधी करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या? याविषयी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...

अधिक मास म्हणजे काय? | What is Adhik Maas or Purushottam Maas Meaning and Concept

हिंदू पंचांगानुसार चंद्रमास आणि सूर्यवर्ष यामध्ये साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण प्रत्येक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात.
हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि भगवान श्रीकृष्णाला समर्पित असतो.

Advertisement

अधिक मासाचे महात्म्य काय? | Significance and Importance of Adhik Maas in Hindu Dharma

  1. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी फळ देते.
  2. श्रीविष्णू आणि गोपालकृष्णाची भक्ती केल्यास मनःशांती, सुख आणि समाधान मिळते.
  3. भागवत वाचन, गीता पाठ, नामस्मरण आणि उपवास यांना विशेष महत्त्व असते.
  4. गरीबांना अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, धान्यदान केल्यास पुण्य लाभते.
  5. या महिन्यात केलेले सत्कर्म जीवनातील अडथळे दूर करतात असे मानले जाते.
अधिक मासात काय करावे? | What to Do in Adhik Maas Rituals and Auspicious Activities
  1. "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी" या मंत्राचा जप
  2. तुळशी पूजन/ तुळशीला प्रदक्षिणा घालावी
  3. गाईला अन्न देणे
  4. भागवत आणि गीतेचे वाचन
  5. ब्राह्मण भोजन आणि दान
  6. सकाळ-संध्याकाळ दीप लावणे
  7. दररोज सकाळी स्नान करून विष्णू पूजन करावे
  8. "ॐ नमो भगवते वासुदेवाय" मंत्र जप करावे
  9. विष्णुसहस्रनाम पठण
  10. सायंकाळी तुपाचा दिवा लावावा
  11. शक्य असल्यास उपवास / एकभुक्त / नक्तभोजन करावे
  12. गाईला हिरवा चारा द्यावा
  13. गरजूंना अन्नदान करावे
  14. पक्षांना पाणी ठेवावे
  15. वृद्ध आणि आजारी व्यक्तींची सेवा करावी
  16. दर गुरुवारी पिवळे वस्त्र किंवा हरभरा डाळ दान करावी
गोपालकृष्णाचे विशेष महत्त्व | Special Significance of Lord Krishna Devotion in Adhik Maas 

अधिक मास हा भगवान श्रीकृष्णाचा प्रिय महिना मानला जातो.
गोपालकृष्णाची भक्ती केल्याने घरात आनंद, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
बालगोपालाचे निरागस रूप मनाला शांती आणि भक्तीची अनुभूती देते.

अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंची विशेष कृपा मिळवण्याचा महिना | Blessings of Lord Vishnu and Spiritual Benefits of Adhik Maas
 
अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा अधिक ज्येष्ठ असेही म्हणतात.
हा महिना साधना, जप, दान, सेवा आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.

अधिक मास का येतो? | Scientific and Astronomical Reason Behind Adhik Maas Calculation

हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यामध्ये फरक पडतो.
हा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे 32 महिने 16 दिवसांनी एक अधिक मास येतो.
ज्या चांद्रमासात सूर्याचे संक्रमण होत नाही, तो महिना "अधिक मास" म्हणून ओळखला जातो.

(नक्की वाचा: Interesting news: 600 जावई, 3500 किलो आंबे,7 हजार लिटर आमरस अन् शाही बेत, काय असते ही धोंडे जेवणाची प्रथा?)

Advertisement

अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा का करतात? | Why Lord Vishnu is Worshipped in Adhik Maas Mythological Story

पुराणानुसार सर्व महिन्यांनी मलमासाला कमी लेखले.
तेव्हा हा महिना भगवान विष्णूंना शरण गेला.
भगवान विष्णूंनी त्याला "पुरुषोत्तम मास" हे श्रेष्ठ नाव दिले आणि सांगितले, "जो भक्त या महिन्यात माझे नामस्मरण, जप, दान आणि सेवा करेल, त्याला विशेष पुण्य प्राप्त होईल."

अधिक मासात कोणते दान श्रेष्ठ? | Best Things to Donate in Adhik Maas for Good Fortune

  • अन्नदान
  • दीपदान
  • गोदान
  • तांबूल दान
  • सुवर्णदान (यथाशक्ती)
  • अपूपदान (अनारसे दान)
  • धार्मिक ग्रंथ दान

अपूपदान म्हणजे काय? | What is Apoopa Daan Meaning and Importance of Anarse Daan

अपूप म्हणजे अनारसे.
अधिक मासात 33 अनारसे दक्षिणेसह योग्य ब्राह्मणाला दान करणे पुण्यकारक मानले जाते.
अपूपदान संकल्प
"मम समस्त पापक्षयपूर्वकं,
पुत्रपौत्र धनधान्य सुखसमृद्धि प्राप्त्यर्थं,
भगवान श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थं,
मलमास निमित्त 33 अपूपदानं
यथाशक्ती दक्षिणासहितं करिष्ये।"

Advertisement

(नक्की वाचा : Adhik Maas 2026 : अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? 33 धोंडे वाण देण्याची प्रथा नेमकी काय आहे?)

अधिक मासात काय टाळावे? | What to Avoid in Adhik Maas Prohibited Activities and Rules

  • विवाह
  • गृहप्रवेश
  • वास्तुशांती
  • नवीन व्यवसाय सुरू करणे
  • मुंज / उपनयन
  • देव प्रतिष्ठापना
  • अनावश्यक वाद-विवाद
  • अपशब्द आणि राग

अधिक मासातील काही विशेष दिवस | Most Auspicious Days and Dates in Adhik Maas 2026

  • पौर्णिमा
  • अमावस्या
  • एकादशी
  • व्यतिपात
  • वैधृति योग


या दिवशी जप, दान आणि पूजा केल्यास अधिक पुण्य मिळते असे मानले जाते.

अधिक मासात कोणते मंत्र म्हणावे? | Powerful Mantras to Chanting During Purushottam Maas | Adhik Maas 2026

"ॐ नमो भगवते वासुदेवाय"
"श्री विष्णवे नमः"
"हरे राम हरे कृष्ण"
विष्णुसहस्रनाम

अधिक मासाचा खरा संदेश | The True Spiritual Message of Adhik Maas for Self Improvement

अधिक मास म्हणजे फक्त कर्मकांड नाही…
तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याची संधी आहे.
जास्त नामस्मरण
जास्त दान
जास्त सेवा
जास्त संयम
जास्त श्रद्धा
यामुळे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते असे मानले जाते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)