जाहिरात

अधिक मासातील 33 दानांचे गुपित; कोणती वस्तू दान केल्याने कोणते लाभ मिळतात? वाचा ज्योतिषींनी दिलेली मोठी माहिती

Adhik Maas 2026: अधिक मासात 33 दाने देण्यामागचे रहस्य काय? ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांच्याकडून जाणून घ्या पुरुषोत्तम मासातील या 33 महादानांचे छुपे फायदे आणि जीवनातील सर्व दोष दूर करून सुख-समृद्धी मिळवण्याची गुप्त पद्धत.

अधिक मासातील 33 दानांचे गुपित; कोणती वस्तू दान केल्याने कोणते लाभ मिळतात? वाचा ज्योतिषींनी दिलेली मोठी माहिती
"Adhik Maas 2026: अधिक मासात या 33 गोष्टींचे दान केल्यास कोणते फायदे मिळतील?"
Canva

- ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी
Adhik Maas 2026: 
हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा दान, जप, तप आणि पुण्यकर्मासाठी अतिशय पवित्र मानला जातो. या काळात केलेल्या व्रतांचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शास्त्रात अधिक मासादरम्यान "33 दाने" करण्याची विशेष परंपरा सांगितली आहे. ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांच्या माहितीनुसार, ही दाने नेहमी श्रद्धा, नम्रता आणि निःस्वार्थ भावनेने करावी. यामुळे जीवनातील दोष दूर होऊन सुख-समृद्धी लाभते. जाणून घेऊया ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी यांनी सांगितलेले 33 दानांचे स्वरूप आणि त्यांचे महत्त्व.

अधिक मासातील 33 दाने

दान, जप, तप आणि पुण्यकर्मीसाठी सर्वोत्तम काळ !

महत्त्वाचे संकल्प

अधिक मास (पुरुषोत्तम मास) हा दान, जप, तप आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. 
अधिक मासात केलेले दान, जप आणि व्रत यांचे फळ अनेक पटीने वाढते.
शास्त्रात 33 दाने करण्याची परंपरा सांगितली आहे.
शक्य असेल तसे दान करावे आणि मनापासून ईश्वर स्मरण करावे.
दान हे नेहमी श्रद्धा, नम्रता आणि निःस्वार्थ भावनेने करावे.

अधिक मासातील 33 दाने, दानाचे स्वरुप आणि दानाचे फायदे

1 अन्नदान
दानाचे स्वरुप: भोजन, धान्य, जेवण
दानाचे फायदे: भूक निवारण, पुण्यवृद्धी

2 जलदान
दानाचे स्वरुप: पाणी, पिण्याचे पाणी, घडे
दानाचे फायदे: तृषा निवारण, आयुष्य वाढते

3 वस्त्रदान
दानाचे स्वरुप: कपडे, साडी, धोतर, चादर
दानाचे फायदे: गरजूंना मदत, पुण्यलाभ

4 तांदूळ (अक्षत) दान
दानाचे स्वरुप: तांदूळ, अक्षत
दानाचे फायदे: मांगलिक कार्य सिद्धी

5 गहू दान
दानाचे स्वरुप: गहू
दानाचे फायदे: समृद्धी आणि आरोग्य

6 तूप दान
दानाचे स्वरुप: शुद्ध तूप
दानाचे फायदे: आरोग्य, तेज, पुण्य

7 साखर दान
दानाचे स्वरुप: साखर
दानाचे फायदे: गोड वाणी, आनंद

8 गूळ दान
दानाचे स्वरुप: गूळ
दानाचे फायदे: आरोग्य, दोष निवारण

9 मीठ दान
दानाचे स्वरुप: मीठ
दानाचे फायदे: अडथळे दूर होतात

10 तेल दान
दानाचे स्वरुप: तीळ तेल / इतर तेल
दानाचे फायदे: आरोग्य, शांती

11 दूध दान
दानाचे स्वरुप: दूध
दानाचे फायदे: पोषण, पुण्य

12 दही दान
दानाचे स्वरुप: दही
दानाचे फायदे: संतोष, आरोग्य

13 मध दान
दानाचे स्वरुप: मध
दानाचे फायदे: माधुर्य, आयुष्य वाढते

14 फळे दान
दानाचे स्वरुप: हंगामी फळे
दानाचे फायदे: आरोग्य, समूद्धी

15 भाज्या दान
दानाचे स्वरुप: भाज्या
दानाचे फायदे: सद्भाव, अन्नपूर्णा कृपा

16 सोने दान
दानाचे स्वरुप: सोने (शक्य असल्यास)
दानाचे फायदे: धन, कीर्ती, पुण्य

17 चांदी दान
दानाचे स्वरुप: चांदी
दानाचे फायदे: समृद्धी, शांती

18 तांबे दान
दानाचे स्वरुप: तांबे भांडी / तांबे
दानाचे फायदे: आरोग्य, दोष निवारण

19 लोखंड दान
दानाचे स्वरुप: लोखंडी वस्तू
दानाचे फायदे: शक्ती, स्थैर्य

20 जमीन दान
दानाचे स्वरुप: जमीन (शक्य असल्यास)
दानाचे फायदे: दीर्घकाळ पुण्य

(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात जावयाला 33 अनारसे दान का करतात? लेकीच्या संसारात काय बदलतं? ज्योतिषी कुलकर्णींनी सांगितलेले शास्त्र वाचा)

21 गौदान
दानाचे स्वरुप: गाय दान (शक्य असल्यास)
दानाचे फायदे: मोक्षप्राप्ती, पुण्य

22 छत्री दान
दानाचे स्वरुप: छत्री / सावलीची व्यवस्था
दानाचे फायदे: उपकार, संरक्षण

23 चप्पल / पादत्राणे दान
दानाचे स्वरुप: चप्पल, बूट
दानाचे फायदे: प्रवासात सहाय्य, पुण्य

24 आसन दान
दानाचे स्वरुप: आसन, पाट, गादी
दानाचे फायदे: स्थैर्य, मान-सन्मान

25 पुस्तक / ग्रंथ दान
दानाचे स्वरुप: पुस्तके, धर्मग्रंथ
दानाचे फायदे: विद्या, ज्ञानवृद्धी

(नक्की वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात दीपदान का करावे? 9 प्रमुख तिथीसह 33 संख्येचं महत्त्व, वाचा वेदमूर्तींची माहिती)

26 दीपदान
दानाचे स्वरुप: दिवा, तैलाचा दिवा
दानाचे फायदे: अंधार निवारण, ज्ञानप्राप्ती

27 धूप / अगरबत्ती दान
दानाचे स्वरुप: धूप, अगरबत्ती
दानाचे फायदे: सुगंध, प्रसन्नता

28 शय्यादान
दानाचे स्वरुप: बिछाना, गादी, उशी
दानाचे फायदे: आरोग्य, सुख

(नक्की वाचा: Adhik Maas 2026: अधिक मासात मुलीला चांदीची जोडवी का देतात? ज्योतिषी जोशींनी सांगितलेले 5 फायदे ऐकून थक्क व्हाल)

29 कंबळ / चादर दान
दानाचे स्वरुप: कंबळ, चादर
दानाचे फायदे: थंडीपासून संरक्षण

30 औषध दान
दानाचे स्वरुप: औषधे, वैद्यकीय मदत
दानाचे फायदे: आरोग्य, दीर्घायुष्य

31 विद्या दान
दानाचे स्वरुप: शिक्षणासाठी मदत
दानाचे फायदे: ज्ञान, उज्ज्वल भविष्य

32 सुवासिक वस्तू दान
दानाचे स्वरुप: चंदन, अत्तर, सुगंधी वस्तू
दानाचे फायदे: सौख्य, सुगंधित जीवन

33 दक्षिणा दान
दानाचे स्वरुप: ब्राह्मण / गरजूंना दक्षिणा
दानाचे फायदे: सर्व कार्य सिद्धी, पुण्य 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com