'Meta AI' देणार 'Gemini AI' ला टक्कर; फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाचा वापर होणार सोपा

लार्ज लँग्वेज मॉडेलसह हे विकसित केल्याचं कंपनीचं म्हणणे आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर मेटा एआय सुरू केल्याने लाखो यूजर्संना याचा फायदा होणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Google ने काही दिवसांपूर्वीच भारतात 9 भाषांमध्ये जेमिनीचे मोबाइल ॲप (Gemini AI App) लॉन्च केले. आता Meta ने  देखील भारतात WhatsApp, Facebook, Instagram, Messenger आणि Meta.AI वर आपला आर्टिफिसियल इंटेलिजेन्स असिस्टंट 'Meta AI' सादर केला आहे. 

लार्ज लँग्वेज मॉडेलसह मेटा एआय विकसित केल्याचं कंपनीचं म्हणणे आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर मेटा एआय सुरू केल्याने लाखो यूजर्संना याचा फायदा होणार आहे. कंन्टेट तयार करण्यापासून ते कोणत्याही विषयावर माहिती मिळवण्यापर्यंत, यासारखी कामे आता थेट मेटा एआयद्वारे पूर्ण केली जातील.

(नक्की वाचा- गुगलने भारतात 9 भाषांमध्ये AI असिस्टंट जेमिनी मोबाइल अ‍ॅप केले लाँच)

रिपोर्टनुसार, Meta ने सांगितले की Meta AI भारतात इंग्रजीमध्ये लॉन्च होत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आता भारतीय यूजर्स Meta AI वापरून व्हॉट्सअॅप, फेसबूक, आणि इन्स्टाग्रामवरील आपल्या यूजर अनुभव चांगला करु शकतात. 

AI द्वारे लोकांना त्यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.  मेटा एआयमध्येही हे शक्य होणार आहे. म्हणजे जर तुम्हा आपल्या भागातील हवामान जाणून घ्यायची असल्यास गूगलवर जावं लागणार नाही. हीच गोष्ट तुम्ही थेट व्हॉट्सॲप चॅटवर करू शकता. 

Advertisement

(नक्की वाचा- रेल्वे तिकीट बुक करताना इन्शुरन्स कसे काढावे? 45 पैशांमध्ये मिळतो 10 लाखांपर्यंतचा क्लेम))

WhatsApp वर इनबिल्ट मेटा AI वर क्लिक केले आणि त्याच्याशी चॅटिंग सुरू करुन तुम्ही तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवू शकता. कंपनीने सांगितले की, Meta AI वर बरीच माहिती मिळू शकते. व्हॉट्सअॅपप्रमाणेच, फेसबुक फीडमधून स्क्रोल करताच यूजर्स मेटा एआयमध्ये जाऊ शकतात.

Topics mentioned in this article