best age gap for marriage : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात लग्नाचा निर्णय खूप महत्त्वाचा असतो. सर्वसाधारणपणे पाहिलं गेलं तर विवाहित जोडप्यात पतीपेक्षा पत्नी वयाने लहान असते. जोडप्यानुसार वयाचं अंतर कमी-जास्त होत असतं. सुखी वैवाहिक जीवनासाठी वयातील योग्य अंतर किती असावं? संशोधनानुसार, पती-पत्नीमध्ये ५ ते ७ वर्षांचं अंतर सामान्य आणि योग्य मानलं जातं. जर वयाचं अंतर जास्त असेल तर वैचारिक आणि लाइफस्टाइलमध्ये बदल असल्याने नात्यात अडचणी येऊ शकतात. तर ज्या दाम्पत्याची आवड-नावड सारखी असतात, त्यांचं लग्न अधिक काळ टिकतं.
एकसारखे छंद...
यामध्ये आवडती मालिका, चित्रपट पाहणे, बाहेर खाणं किंवा फिरणं यांसारख्या अनेक गोष्टी एकत्र केल्यानं नातं अधिक मजबूत राहतं. जर तुमच्या आवडी-निवडी सारख्या असतील तर एकत्र वेळ घालवणं आनंददायी जातं. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषासोबत लग्न करू नये असा सल्ला दिला जातो. कारण या वयात पुरुष जबाबदारी स्वीकारण्यास पूर्णपणे तयार नसतात. तर २१ वर्षाच्या जवळपास महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक समजूतदार असल्याचं मानलं जातं.
१ ते २ वर्षांचं अंतर...
जर पती-पत्नीमधील अंतर १ ते २ वर्षांचं असेल तर अधिक वाद होण्याची शक्यता असते. याचं कारण म्हणजे, दोघेही आयुष्याच्या एकाच टप्प्यात असतात. ज्यामुळे हट्टीपणा आणि अहंकार यामुळे भांडण होऊ शकतं. दुसरीकडे जर वयाचं अंतर जास्त असेल तर समजूतदारपणा असतो. मोठ्या वयाचा नवरा अधिक संयमी आणि समजूतदार असतो. तर पत्नीचं वय कमी असेल तर ती आपल्या पतीच्या बोलण्याला जास्त महत्त्व देते.
५ ते ७ वर्षांचं अंतर...
५ ते ७ वर्षांचं अंतर संतुलित आणि आनंदी लग्नासाठी योग्य मानलं जातं. रंजक बाब म्हणजे संशोधनात समोर आल्यानुसार, महिला सर्वसाधारणपणे आपल्याहून मोठ्या पुरुषांना पसंत करतात. तर पुरुषांना कमी वयाच्या महिला आकर्षक करीत असतात. शेवटी एक यशस्वी लग्न वयाच्या अंतरावर नाही तर परस्पर सामंजस्य, वागणूक आणि खऱ्या प्रेमावर अवलंबून आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world