जाहिरात

Benefits Of Drinking Coffee : 14 दिवस दररोज कॉफी प्यायल्याने काय होतं? शरीरात होणारे 4 जबरदस्त फायदे

कॉफी प्यायल्याने झोप येत नाही, भीती वाटते किंवा अॅसिडिटी वाढते अशी अनेकांची तक्रार असते.

Benefits Of Drinking Coffee : 14 दिवस दररोज कॉफी प्यायल्याने काय होतं? शरीरात होणारे 4 जबरदस्त फायदे
Coffee Benefits

Benefits Of Drinking Coffee: आपल्यातील अनेक जण दिवसाची सुरुवात एक कप गरमागरम कॉफी किंवा चहासोबत करणं पसंत करतात. कॉफी प्यायल्याने झोप येत नाही, भीती वाटते किंवा अॅसिडिटी वाढते अशी अनेकांची तक्रार असते. खरंच कॉफीमुळे नुकसान होतं का? नुकतच इन्स्टाग्रामवर हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डसारख्या जगातील सर्वात मोठ्या संस्थेत शिक्षण घेतलेले प्रसिद्ध गॅस्ट्रोअँटेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी एक व्हिडिओ शेअर करीत याबाबत माहिती दिली. डॉ. सेठी म्हणाले, जर कॉफी योग्य पद्धतीने  आणि योग्य प्रमाणात प्यायल्यात तर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 
 

नक्की वाचा - High Blood Sugar : रक्तातील साखर का वाढते? केवळ गोड नाही ही 4 कारणंही आहेत जबाबदार

कॉफी पिण्याचे ४ महत्त्वाचे फायदे...

१ लिव्हर - 

डॉ. सेठी यांनी सांगितलं, दररोज कॉफी पिणं लिव्हरसाठी फायदेशीर असतं. कॉफीमुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होत नाही आणि फायब्रोसिस-सिरोसिस सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या लिव्हरमध्ये सर्व्हिसिंग करीत हेल्दी ठेवतं. 


२ मेटाबॉलिज्म 

कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड सारखी तत्व असतात. यामुळे शरीरातील इन्शुलिन सेंसिटीव्हिटी सुधारते. याचा अर्थ तुमचं शरीर जेवणातून मिळणाऱ्या ऊर्जेचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतं आणि तुमचं मेटाबॉलिज्म सुधारतं. 

३ मेंदू 

डॉ. सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉफीमधून कॅफिन तुमचा मेंदू अलर्ट ठेवतो आणि फोकस वाढवतो. कॉफीमुळे तुमची झोप जाते, इतकच नव्हे तर तुमचं मानसिक आरोग्य सुधारते. ज्यामुळे तुम्ही अॅक्टिव राहता. 

४ पचनक्रिया

डॉ. सेठी यांनी सांगितलं, कॉफी बाऊल मुव्हमेंट (Bowel Movement) सोपं करतं. कॉफीमुळे आतड्यांच्या हालचालीस चालना मिळते. ज्यामुळे पचनक्रिया सहज होते आणि पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. 


कॉफी पिताना काय काळजी घ्याल?

डॉ. सेठी यांनी कॉफी पिताना काही काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्या लोकांना इरिटेबल बॉवल सिंड्रोम (IBS) चा त्रास असेल त्यांनी विचारपूर्वक कॉफीचं सेवन करावं. कारण यातून समस्या वाढू शकते. 


एका दिवसात किती कॉफी पिऊ शकता?

दिवसभरात १ ते ३ कप ब्लॅक कॉफी पिऊ शकता. मात्र कॉफी प्यायल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढत असतील किंवा अस्वस्थता, झोप न येण्यासारखी समस्या उद्भवत असेल तर याचं प्रमाण कमी करावं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com