
Aloo Wadi Recipes In Marathi : पारंपरिक पद्धतीने अळु वडीची रेसिपी तुम्ही आजवर अनेकदा केली असेल. पण ग्लासचा वापर करून अळु वडी तयार केली आहे का? अतिशय सोपी आणि झटकन होणारी रेपिसी आहे. जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पाककृती...
सामग्री :
अळुची पाने, बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, ओवा, जिरे, हळद, हिरवी मिरची, लसूण, आले, चिंचेचे पाणी, मीठ, तेल
(नक्की वाचा: ओल्या नारळाची करंजी रेसिपी)
अळुच्या वड्या कशा तयार कराव्या (Aloo Wadi Recipes By Using Glass)
- अळुची पाने पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यानंतर एका कापडाने पुसून पाने कोरडी करा.
- अळुची पाने व्यवस्थित चिरून घ्या.
- यानंतर एका भांड्यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करा.
- पिठामध्ये तीळ आणि ओवा मिक्स करा.
- खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आले कुटून घ्या.
- सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करा आणि त्यामध्ये चिंचेचे पाणी मिक्स करा.
- तयार केलेल्या मसाल्यामध्ये अळुची चिरलेली पाने मिक्स करा.
- चवीनुसार मीठ, हळद, जिरे आणि पाणी मिक्स करा.
- अळु वडीचे मिश्रण तयार झाल्यानंतर ग्लास घ्या आणि आतील बाजूने तेल लावा.
- दुसरीकडे गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर पात्रामध्ये अळु वडी शिजवण्यासाठी ठेवा.
- अळु वडी शिजल्यानंतर बाहेर काढा आणि काप तयार करा.
(नक्की वाचा: सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचाय? फॉलो करा या टिप्स)
कढईमध्ये तेल गरम करा आणि वड्या तळून घ्या.
वड्या करपणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
तयार झाल्या आहेत कुरकुरीत अळु वड्या. सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत वड्यांचा आस्वाद घ्यावा...
Video Credit @ Ruchkar Maharashtra Instagram
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world