जाहिरात

Amazon-Flipkart Sale 2025: सेलमध्ये वस्तू खरंच स्वस्त आहेत का? या दोन ट्रिक्स वापरून काही सेकंदात चेक करा

Amazon vs Flipkart Sale 2025: सेलमध्ये कंपन्या ‘भारी डिस्काउंट’ असल्याचा दावा करून अनेकदा ग्राहकांना आकर्षित करतात. पण, एखादी वस्तू खरंच स्वस्त झाली आहे का, हे तपासणे अनेकदा कठीण जाते.

Amazon-Flipkart Sale 2025: सेलमध्ये वस्तू खरंच स्वस्त आहेत का? या दोन ट्रिक्स वापरून काही सेकंदात चेक करा

Amazon vs Flipkart Sale 2025: सध्या ॲमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आणि फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज' सारख्या मोठ्या सेलमुळे ऑनलाइन खरेदीचा उत्साह वाढला आहे. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्ट ‘बिग बिलियन डेज' सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. अनेक ग्राहक या संधीचा फायदा घेऊन स्मार्टफोन, लॅपटॉप, हेडफोन्स आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

मात्र, या सेलमध्ये कंपन्या ‘भारी डिस्काउंट' असल्याचा दावा करून अनेकदा ग्राहकांना आकर्षित करतात. पण, एखादी वस्तू खरंच स्वस्त झाली आहे का, हे तपासणे अनेकदा कठीण जाते. यासाठी दोन सोप्या पण अत्यंत प्रभावी ट्रिक्स उपलब्ध आहेत, ज्या वापरून तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिची किंमत तपासू शकता आणि फसगत होण्यापासून वाचू शकता. 

पहिली ट्रिक: 'Buyhatke:AI' ॲप्लिकेशन

ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘Buyhatke:AI' नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. हे ॲप तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टच्या किमतीचा मागील काही महिन्यांचा इतिहास दाखवते. ज्यामुळे तुम्हाला हे समजते की सध्याची किंमत ही सर्वात कमी आहे की यापूर्वी ती अजून स्वस्त होती.

या अॅपवर तुम्हाला त्या प्रॉडक्टची किंमत किती वाढली किंवा कमी झाली याचा ग्राफ दिसेल. या ग्राफवरून तुम्ही ठरवू शकता की सध्याची किंमत तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही. एवढंच नाही तर, या ॲपमध्ये ‘कम्पेअर' नावाचा एक टॅबसुद्धा असतो, जिथे तुम्ही हे प्रॉडक्ट इतर वेबसाइट्सवर किती किमतीला उपलब्ध आहे, हे तपासू शकता.

दुसरी ट्रिक: 'Pricehistoryapp.com' वेबसाइट

यासाठी तुम्हाला कोणत्याही ॲपची गरज नाही, फक्त एक वेबसाइट पुरेशी आहे. pricehistoryapp.com. या वेबसाइटवर तुम्ही वस्तूच्या किमतीची तुलना करू शकता. ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरील तुम्हाला हवे असलेल्या प्रॉडक्टची लिंक कॉपी करा. तुमच्या ब्राउझरमध्ये pricehistoryapp.com ही वेबसाइट उघडा. वेबसाइटवर तुम्हाला एक सर्च बार दिसेल. तिथे तुम्ही कॉपी केलेली प्रॉडक्टची लिंक पेस्ट करा आणि सर्च करा.

लगेचच तुम्हाला प्रॉडक्टच्या किमतीचा मागील वर्षाभराचा ग्राफ दिसेल. या ग्राफवरून तुम्हाला समजेल की ही किंमत सर्वात कमी आहे की नाही. सोबतच, ही वेबसाइट तुम्हाला प्रॉडक्ट सध्या खरेदी करणे योग्य आहे की नाही, याचा थेट सल्लासुद्धा देते.

या दोन ट्रिक्स वापरून तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करताना मोठी बचत करू शकता आणि सेलच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता. ऑनलाइन खरेदी करताना ही माहिती खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक खरेदीचा निर्णय अधिक माहितीपूर्वक घेऊ शकता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com