
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि Amazon त्यांच्या वर्षातील सर्वात मोठ्या ‘फेस्टिव्ह सेल'साठी सज्ज झाले आहेत. फ्लिपकार्टचा Big Billion Days आणि ॲमेझॉनचा Great Indian Festival दोन्ही 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. या सेलमध्ये विशेषतः टेक प्रेमींसाठी iPhone वर आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या ‘आयफोन 17 सीरिज'वर कोणतीही सूट नसणार असली तरी, जुन्या मॉडेल्सवर मात्र मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे.
या सेलमध्ये आयफोन 16, आयफोन 16 प्रो, आयफोन 15 आणि आयफोन 14 या मॉडेल्सवर सवलत मिळेल. तसेच, स्वस्त आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आयफोन 13 (iPhone 13) देखील एक चांगला पर्याय असेल. आयफोनवर जवळपास 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Amazon-Flipkart Sale 2025: सर्वात कमी किमतीत वस्तू कशी खरेदी कराल? या 2 ट्रिक समजून घ्या)
फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज' सेल
फ्लिपकार्टने ‘आयफोन 16' सीरिजला या सेलचे मुख्य आकर्षण बनवले आहे. बेस मॉडेल आयफोन 16 ची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. ती अलीकडे 69,990 रुपयांना मिळत होती, पण सेलमध्ये त्याची किंमत थेट 51,999 रुपयांपर्यंत खाली येईल. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरमुळे याची किंमत आणखी कमी होऊ शकते.
त्याचप्रमाणे, आयफोन 16 प्रो (iPhone 16 Pro) 1,19,900 रुपयांवरून 69,999 रुपयांपर्यंत, तर आयफोन 16 प्रो मॅक्स (iPhone 16 Pro Max) 1,44,900 रुपयांवरून 89,999 रुपयांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक मेबर्संना 22 सप्टेंबरपासून या सेलचा लवकर लाभ घेता येईल.
(नक्की वाचा- Festival Sale 2025: फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताय? ‘या' 10 स्मार्ट टिप्स नक्की लक्षात ठेवा)
ॲमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल
ॲमेझॉनही आयफोन मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स देऊन फ्लिपकार्टला कडवी टक्कर देत आहे. आयफोन 16 प्रोची किंमत क्रेडिट कार्ड आणि एक्सचेंज ऑफर एकत्र करून 57,105 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते, जी फ्लिपकार्टच्या किमतीपेक्षाही कमी आहे. आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमतही 89,999 रुपये असेल. ॲमेझॉनने अजून आयफोन 15 (iPhone 15) च्या किमती जाहीर केलेल्या नाहीत, परंतु संकेत असे आहेत की या मॉडेलवर फ्लिपकार्टपेक्षा चांगली डील मिळू शकते.
जुने आयफोन मॉडेल्स कमी किमतीत खरेदी करण्याची संधी शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हे दोन्ही सेल अत्यंत फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला आयफोन अपग्रेड करायचा असेल किंवा नवीन आयफोन घ्यायचा असेल, तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world