जाहिरात

Online Shopping: ऑनलाइन सेलमध्ये वस्तू इतक्या कशा मिळतात? कंपन्यांची छुपी बिझनेस स्ट्रॅटेजी जाणून घ्या

अनेकदा तर या सवलती 80% पर्यंत असतात. ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटते की कंपन्या इतका स्वस्त माल कसा विकू शकतात. हा केवळ ग्राहकांना आकर्षित करण्याचा एक मार्ग आहे की यामागे काही व्यावसायिक रणनीती लपलेली आहे?

Online Shopping: ऑनलाइन सेलमध्ये वस्तू इतक्या कशा मिळतात? कंपन्यांची छुपी बिझनेस स्ट्रॅटेजी जाणून घ्या

Online Shopping: ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड आजकाल खूप वाढला आहे. ग्राहक Flipkart, Amazon, Meesho आणि Myntra सारख्या ई-कॉमर्स साइट्सवर मिळणाऱ्या भरघोस सवलतींचा फायदा घेतात. अनेकदा तर या सवलती 80% पर्यंत असतात. ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटते की कंपन्या इतका स्वस्त माल कसा विकू शकतात. हा केवळ ग्राहकांना आकर्षित करण्याचा एक मार्ग आहे की यामागे काही व्यावसायिक रणनीती लपलेली आहे? यामागची काही मोठी कारणे जाणून घेऊया.

ऑनलाइन कंपन्या स्वस्त माल का विकतात?

1. घाऊक खरेदी आणि जुना स्टॉक लवकर काढणे

Flipkart आणि Amazon सारख्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या थेट ब्रँड्स आणि उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात. जेव्हा माल घाऊक दरात घेतला जातो, तेव्हा त्याची प्रति युनिट किंमत खूप कमी होते, ज्याचा फायदा ग्राहकांना दिला जातो. याशिवाय, जेव्हा एखाद्या प्रोडक्टचे नवीन मॉडेल बाजारात येते, तेव्हा कंपन्या जुना स्टॉक लवकर काढण्यासाठी त्यावर मोठी सवलत देतात.

(नक्की वाचा-  Amazon-Flipkart Sale 2025: सर्वात कमी किमतीत वस्तू कशी खरेदी कराल? या 2 ट्रिक समजून घ्या)

2. कमी खर्च, जास्त फायदा

दुकानांच्या तुलनेत ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा खर्च खूप कमी असतो. त्यांना दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार आणि वीज-पाण्यासारखे खर्च भरावे लागत नाहीत. त्यांना फक्त वेअरहाऊस आणि डिलिव्हरीचा खर्च सांभाळावा लागतो. या कमी खर्चांमुळे ते ग्राहकांना कमी दरात प्रोडक्ट विकूनही नफा मिळवू शकतात.

3. ब्रँड प्रमोशन आणि मार्केटिंगची रणनीती

कंपन्या वेळोवेळी मोठे सेल यासाठी आयोजित करतात जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्यांच्या वेबसाइट किंवा ॲपवर येतील. ही एक प्रकारची मार्केटिंगची रणनीती आहे. एकदा ग्राहक साइटवर आला की तो फक्त ऑफरमधील वस्तूच नव्हे, तर इतरही अनेक गोष्टी खरेदी करतो, ज्यामुळे कंपनीचा नफा वाढतो.

(नक्की वाचा-  Festival Sale 2025: फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाईन शॉपिंग करताय? ‘या' 10 स्मार्ट टिप्स नक्की लक्षात ठेवा)

4. सण आणि खरेदीचं समीकरण

सणासुदीच्या काळात लोकांना जास्त खरेदी करायची इच्छा असते. कंपन्या याच संधीचा फायदा घेतात आणि "फ्लॅश सेल", "लिमिटेड टाइम ऑफर" किंवा "बिग बिलियन डेज" यांसारखी नावे वापरून ग्राहकांना तात्काळ खरेदीसाठी प्रोत्साहित करतात. लोकांना असे वाटते की जर त्यांनी आता खरेदी केली नाही, तर नंतर त्याच वस्तूंसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. याच कारणामुळे ग्राहक लगेच खरेदी करतात.

5. बनावट सवलतींचे जाळे

ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकदा बनावट सवलतींचे जाळे पसरवले जाते. यात अनेकदा वस्तूची मूळ किंमत आधी वाढवून दाखवली जाते आणि नंतर त्यावर मोठी सवलत दिली जाते. ग्राहकाला वाटते की त्याला खूप कमी किमतीत वस्तू मिळत आहे, पण प्रत्यक्षात ती वस्तू तेवढी स्वस्त नसते. हा प्रकार ई-कॉमर्समध्ये खूप सामान्य आहे. पण हेही खरे आहे की प्रत्येक सवलत बनावट नसते, काहीवेळा ती फक्त कंपन्यांच्या व्यावसायिक धोरणाचा एक भाग असतो.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com