जाहिरात

Angarki Sankashti Chaturthi 2025: अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात महापूजा, नैवेद्य आरती आणि दर्शन कधी करता येईल? सविस्तर माहिती वाचा

Angarki Sankashti Chaturthi 2025: अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त दादर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये दर्शनाची वेळ, महापूजा, नैवेद्य आरती यासह सर्व गोष्टींची माहिती एका क्लिक जाणून घ्या...

Angarki Sankashti Chaturthi 2025: अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात महापूजा, नैवेद्य आरती आणि दर्शन कधी करता येईल? सविस्तर माहिती वाचा
Angarki Sankashti Chaturthi 2025: अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कार्यक्रम

Angarki Sankashti Chaturthi 2025: अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त (Angark Sankasht Chaturthi) प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये (Siddhivinayak Temple) जय्यत तयारी केली जाते. यंदा 12 ऑगस्टला अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर न्यास प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त (12 ऑगस्ट 2025) श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार असाल तर गणपती बाप्पाची महापूजा, नैवेद्य आरती, दर्शनाच्या वेळा, दर्शनाची रांग यासह सर्व नियोजनाची माहिती जाणून घ्या...

अंगारक संकष्ट चतुर्थी 2025 कार्यक्रम (Angarki Sankashti Chaturthi 2025 Program)

चंद्रोदय कधी आहे? (Chandroday Time)

  • मंगळवार 12 ऑगस्ट 2025
  • रात्री 9:17 वाजता

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची महापूजा, नैवेद्य आरती आणि दर्शनाच्या वेळांची माहिती 

  • पहाटे 3.15 वाजेपासून ते 3.50 वाजेपर्यंत आरती (Shri Siddhivinayak Temple Aarti, Mahapuja, Bhog Aarti, Darshan Time)
  • दुपारी 12.15 वाजेपासून ते 12.30 वाजेपर्यंत नैवेद्य
  • संध्याकाळी 7 वाजता धूपारती  (दर्शन रांग सुरू असताना धूपारती)
  • रात्री 9 वाजेपासून ते रात्री 9.30 वाजेपर्यंत नैवेद्य आणि आरती 

गणपती बाप्पाच्या दर्शनाची वेळ (Shri Siddhivinayak Temple Darshan Time)

  • सोमवार (11 ऑगस्ट) मध्यरात्री 1.30 वाजेपासून ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत. 
  • पहाटे 3.50 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत. 
  • रात्रौ 9.30 वाजेपासून ते रात्री 11.50 वाजेपर्यंत. 

भाविकांना न्यासातर्फे देण्यात येणाऱ्या सोयी (Facilities Provided By Shri Siddhivinayak Temple Trust To Devotees)

  • सिद्धिविनायक अ‍ॅपद्वारे गणपती बाप्पाच्या दर्शनाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 
  • पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या रांगेसाठी मंडप उभारण्यात येणार आहे.
  • भाविकांच्या सोयीसाठी मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे. 
  • मुखदर्शन चप्पल स्टँड व्यवस्था सिद्धी प्रवेशद्वाराबाहेरील पार्किंगजवळ करण्यात येणार आहे.
  • गणपती बाप्पाचे दुरुन दर्शनाची व्यवस्था एस.के. बोले मार्गावरील मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून करण्यात येणार आहे.
  • मंदिरातर्फे रुग्णवाहिका, पाणपोई तसेच महापालिकेतर्फे फिरती नैसर्गिक विधीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • मे. हसमुखराय अ‍ॅड कंपनी आणि मे. गिरनार चहा यांच्या सौजन्याने विनामूल्य चहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध सूचना फलक, बॅनर्स, मार्गदर्शिका पोस्टर लावण्यात येणार आहेत.
  • भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू (कॅमेरा, लॅपटॉप, इ.) आणू नये.
  • भाविकांची सोय आणि सुरक्षितता विचारात घेऊन वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार न्यास व्यवस्थापन समितीस राहील.

Sankashti Chaturthi Full List 2025: गणपती बाप्पा मोरया! अंगारकी चतुर्थी कधी आहे? संकष्टी चतुर्थीची संपूर्ण याद

(नक्की वाचा: Sankashti Chaturthi Full List 2025: गणपती बाप्पा मोरया! अंगारकी चतुर्थी कधी आहे? संकष्टी चतुर्थीची संपूर्ण यादी)

भाविकांची दर्शन रांग व्यवस्था (Queue Arrangement For Devotees Shri Siddhivinayak Temple Dadar)

आशिर्वचन पूजा रांग: रांगेची सुरुवात सिद्धी प्रवेशद्वार येथील सुरक्षा भिंत, साने गुरुजी उद्यान येथील मंडप, मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 गाभारा. 
बाहेर पडण्याचा मार्ग: मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग).

महिला स्वतंत्र रांग: रांगेची सुरुवात राजे संभाजी उद्यान प्रवेशद्वार (रवींद्र नाट्य मंदिर शेजारी) मंडप, प्रतिक्षालय इमारत गेट क्रमांक 6, प्रतिक्षालय इमारत प्रांगणातील रेलिंग, प्रवेशद्वार क्रमांक 7, गाभारा. 
बाहेर पडण्याचा मार्ग: मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग).

सर्वसामान्य भाविकांसाठी रांग: राजे संभाजी मैदानातील मंडपाजवळ रांग सुरू होईल. 
राजे संभाजी उद्यान प्रवेशद्वार (रवींद्र नाट्य मंदिर शेजारी) पत्रा गेट प्रवेशद्वार क्रमांक 4 गाभारा. 
बाहेर पडण्याचा मार्ग: मंदिर प्रवेशद्वार क्र. ३ रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग).

मुखदर्शनाची दुरून रांग: एस.के बोले मार्ग आगर बाजार, हरदेव कृपा दुकान, सिद्धी प्रवेशद्वार, मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 7. 
बाहेर पडण्याचा मार्ग: मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 1 सिद्धी प्रवेशद्वार (एस. के. बोले मार्ग).

ज्येष्ठ नागरिक/नवजात बालक/दिव्यांग व्यक्ती/गरोदर स्त्रिया रांग: रिद्धी प्रवेशद्वारातून (काकासाहेब गाडगीळ मार्ग) प्रवेशद्वार क्रमांक 5 गाभारा. 
बाहेर पडण्याचा मार्ग: मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 3 रिद्धी प्रवेशद्वार (काकासाहेब गाडगीळ मार्ग).

(नक्की वाचा: Sankashti Chaturthi 2025 Wishes: मोदकाप्रमाणे तुमचे जीवन गोड आणि चंद्रासारखं तेजस्वी व्हावं! संकष्टी चतुर्थीच्या खास शुभेच्छा)

श्री सिद्धिविनायक मंदिरातर्फे करण्यात येणाऱ्या अन्य व्यवस्था

वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका

मंदिर गाभारा परिसरात वैद्यकीय पथक ठेवण्यात येईल. दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था असेल, ज्यात एक कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका असेल.

मंडपातील सुविधा

मंडपात लाइट, फॅन, पिण्याचे पाणी, चहा, मोबाइल टॉयलेट इत्यादी व्यवस्था असेल. 

लाडू / प्रसाद विक्री

प्रसादाचे काउंटर सिद्धी चेकपोस्ट आणि रिद्धी चेकपोस्टच्या बाहेरील बाजूस असतील.

ध्वनीक्षेपक यंत्रणा व मेगा फोन

भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि मेगा फोनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

फायर इंजिनची व्यवस्था

सुरक्षिततेसाठी अग्निशामक वाहन छत्रपती राजेसंभाजी उद्यान येथे ठेवण्यात येणार आहे.

अखंडित विद्युत पुरवठा

बेस्ट प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी अखंडित विद्युत पुरवठा राहण्यासाठी मंदिर परिसरात नियुक्त असतील. जनरेटरचीही व्यवस्था असेल.

प्लाझ्मा टीव्ही

मंडपातील भाविकांना गणपती बाप्पाचे थेट दर्शन घेण्यासाठी प्लाझ्मा टीव्हीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सुरक्षा उपाययोजना

बॅगेज स्कॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे, डीएफएमडी, एचएचएमडी आणि वॉकी-टॉकी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

मेट्रो सुविधा

मेट्रो LINE - 3 (AQUA LINE) ची सुविधा भाविकांना उपलब्ध असेल.

विनामूल्य बससेवा

न्यासातर्फे भाविकांसाठी एकूण 20 खासगी वातानुकूलित बस भाड्याने मागवण्यात येत आहेत. 

बसचा मार्ग

रवींद्र नाट्य मंदिर ते दादर स्थानक असा असेल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com