जाहिरात

Sankashti Chaturthi Full List 2025:अंगारकी चतुर्थी कधी आहे? संकष्टी चतुर्थीची संपूर्ण यादी

Sankashti Chaturthi 2025 Date,Time Full List: ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत दर महिन्याला कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला संकष्टी चतुर्थी आहे याची संपूर्ण माहिती.

Sankashti Chaturthi Full List 2025:अंगारकी चतुर्थी कधी आहे? संकष्टी चतुर्थीची संपूर्ण यादी
मुंबई:

संकष्टी कधी असते हे अनेकांना धावपळीत लक्षात राहात नाही. 2025 सालातील 7 महिने सरले असून उर्वरीत 5 महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे याची यादीच आम्ही वाचकांसाठी देत आहोत. जेणेकरून त्यांना संकष्टी कधी आहे हे लक्षात ठेवणे सोपे जाईल. ऑगस्ट महिन्यातील संकष्टी ही मंगळवारी येत असल्याने अंगारकी संकष्टीचा योग आला आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कोणकोणत्या दिवशी संकष्टी येत आहे ते आपण पाहूयात.  

12 ऑगस्ट अंगारकी चतुर्थी

12 ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, ज्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या दिवशी मंगळवार असल्याने या संकष्टीला 'अंगारकी' असे म्हटले जाते. या दिवशी चंद्रोदय रात्री 9 वाजून 17 मिनिटांनी होणार आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी होईल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी होईल. या दिवशी पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र आहे.

( नक्की वाचा: पुत्रदा एकादशी कधी आहे?  )

10 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी

सप्टेंबर महिन्यात 10 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे, जी बुधवारी येत आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री 8 वाजून 34 मिनिटांनी होईल. सूर्योदय सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी रेवती नक्षत्र आहे.

ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी शुक्रवारी

10 ऑक्टोबर रोजी संकष्टी येत असून याला दाशरथी चतुर्थी आणि करक चतुर्थी असेही म्हटले जाते.  हा दिवस शुक्रवार असून, या दिवशी सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश होत आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी होईल. चंद्रोदय रात्री 8 वाजून 53 मिनिटांनी होणार आहे.

( नक्की वाचा: ऑगस्ट महिन्यात 1 दिवसाचा OFF अन् 4 दिवसांच्या सुट्टीची मजा; Long Weekend कधी आहे, कुठे प्लान कराल? )

नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी कधी आहे?

नोव्हेंबर महिन्यात 8 तारखेला शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी, तर सूर्यास्त 6 वाजून 2 मिनिटांनी होईल. चंद्रोदय रात्री 8 वाजून 41 मिनिटांनी होणार असून, त्या दिवशी मृगशीर्ष नक्षत्र आहे.

डिसेंबर महिन्यात संकष्टी कधी आहे?

डिसेंबर महिन्यात 7 तारखेला रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजता होईल. चंद्रोदय रात्री 8 वाजून 34 मिनिटांनी होणार असून, पुनर्वसू नक्षत्र आहे.

संकष्टी चतुर्थीची यादी एका नजरेत

  1. 12 ऑगस्ट - मंगळवार (अंगारकी )
  2. 10  सप्टेंबर - बुधवार
  3. 10 ऑक्टोबर- शुक्रवार 
  4. 8 नोव्हेंबर- शनिवार
  5. 7 डिसेंबर- रविवार

( नक्की वाचा: तीन ग्रह बदलतायत चाल, ऑगस्ट महिना ठरेल दोन राशींसाठी कमाल )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com