जाहिरात

What is Digital Detox : डिजिटल डिटॉक्स काय आहे? प्रत्येकाने अवलंब करणं का आहे गरजेचं?

डिजिटल डिटॉक्स केवळ तणाव आणि अस्वस्थता कमी करीत नाही तर विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवतो. यामुळे जीवन संतुलित आणि आनंदी राहतं.

What is Digital Detox : डिजिटल डिटॉक्स काय आहे? प्रत्येकाने अवलंब करणं का आहे गरजेचं?

What is Digital Detox : दैनंदिन जीवनात मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडिया आपल्या सवयीचा भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण स्क्रिन पाहत असतो. काम, अभ्यास, मनोरंजन आता सर्व काही डिजिटल झालं आहे. मात्र सतत फोन आणि इंटरनेटवर व्यस्त राहणं हळूहळू आपलं आरोग्य, मानसिक शांतता आणि नात्यावर परिणाम करीत आहे. 

झोप पूर्ण होत नाही, लक्ष केंद्रीत करता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. अशा वेळी डिजिटल डिटॉक्स किंवा काही काळासाठी मोबाइल आणि इंटरनेटपासून लांब राहणं अत्यंत आवश्यक आहे. यातून आपल्याला स्वत:च्या अधिक जवळ जाता येईल, निसर्गाच्या जवळ जाता येईल आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवू शकू. 

डिजिटल डिटॉक्स केवळ तणाव आणि अस्वस्थता कमी करीत नाही तर विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवतो. यामुळे जीवन संतुलित आणि आनंदी राहतं.

जेव्हा मेंदू मोबाइल आणि लॅपटॉपवरून येणारी माहिती घेत राहतो, तेव्हा आपण त्याचा सक्रियपणे वापर करू शकत नाही. यामुळे, आपले विश्लेषणात्मक कौशल्य (विश्लेषण करण्याची क्षमता) आणि सामाजिक आकर्षण कौशल्य (लोकांशी जोडण्याची क्षमता) हळूहळू कमी होऊ लागते. मेंदूचे काम मंदावते आणि विचार करण्यास आणि समजून घेण्यास विलंब होतो.

Online shopping: ऑनलाइन मोबाईल मागवला पण मिळाले दगड- विटा, अशा वेळी कुठे तक्रार कराल? जाणून घ्या सर्व माहिती

नक्की वाचा - Online shopping: ऑनलाइन मोबाईल मागवला पण मिळाले दगड- विटा, अशा वेळी कुठे तक्रार कराल? जाणून घ्या सर्व माहिती

डिजिटल डिटॉक्स कसं कराल? 

आपण स्क्रीन टाइमवर लक्ष द्यायला हवं. मोबाइल आणि लॅपटॉप सोडणं शक्य नाही, मात्र आपण त्याचा किती वापर करतो याकडे लक्ष द्यायला हवं. विनाकारण व्हिडिओ, चॅटिंग किंवा सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. आधी लोक एकमेकांना भेटत होतो. आता लहान लहान गोष्टींसाठी आपण फोनची मदत घेतो. याचा परिणाम आपली भाषा आणि व्यवहारावर होतो. लहान मुलांच्या अभ्यासातही मोबाइल आणि लॅपटॉपची मदत घेतली जाते. मात्र लहान मुलांना फार वेळी फोन देणं योग्य नाही. तुमची मुलं किती वेळ स्क्रिन पाहतात त्याकडे लक्ष द्यायला हवं. मुलांना मैदानी खेळ आणि आऊटडोअर अॅक्टिव्हिटीत व्यस्त ठेवायला हवं.

कामात लॅपटॉपचा वापर करीत असाल तर त्याला पर्याय नाही. मात्र किमान सुट्टीच्या दिवशी आवर्जुन लॅपटॉप आणि दूर ठेवा. मोबाइलचाही वापर करू नका. घरातील सदस्यांसोबत गप्पा मारा, एकत्र जेवा. यातून तुमचा थकवा कमी होईल आणि तुम्हाला ताजंतवानं वाटेल.  


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com