Apple Watch SE 3 आणि AirPods Pro 3 नव्या फीचर्ससह लॉन्च, भारतात किती असेल किंमत?

Apple Watch SE 3 मध्ये 5G सेल्युलर मॉडेम देण्यात आले आहे, ज्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही वॉच फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 8 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते आणि 45 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

ॲपलने आपल्या इव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रोडक्ट लाँच केली आहेत. यात Apple Watch SE 3 आणि AirPods Pro 3 चा समावेश आहे. Apple Watch SE 3 ही मागील व्हर्जनच्या तुलनेत अधिक अडव्हान्स आरोग्य सुविधा, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंख्या सारख्या नवीन फीचर्ससह बाजारात आली आहे. तसेच, AirPods Pro 3 मध्ये नवीन H3 चिप आणि हेल्थ सेन्सर देण्यात आले आहेत, जे युजर्सना उत्तम ऑडिओ आणि आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतील.

Apple Watch SE 3 नवीन फीचर्स आणि किंमत

Apple Watch SE 3 मध्ये 5G सेल्युलर मॉडेम देण्यात आले आहे, ज्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही वॉच फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 8 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते आणि 45 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तसेच, नवीन वॉचओएस 26 (watchOS 26) सह यात लिक्विड ग्लास, वर्कआउट बडी आणि नवीन वॉच फेस असे फीचर्स मिळतात.

(नक्की वाचा-  Apple Event 2025: iPhone 17 मार्केट जाम करणार; दमदार फीचर्ससह नवी सीरिज लॉन्च, वाचा किंमत)

सेल्युलर सपोर्टमुळे युजर्स iPhone जवळ नसतानाही कॉल घेऊ शकतात, मेसेज (Message) पाठवू शकतात आणि आपत्कालीन सेवांचा वापर करू शकतात. या वॉचची किंमत जवळपास 22,000 रुपयांपासून सुरू होते. तर भारतातील किंमत 25,900 पासून सुरू आहे. ती 40mm आणि 44mm अशा दोन साईजमध्ये उपलब्ध आहे. या वॉचसाठी प्री-ऑर्डर सुरू झाली असून, 19 सप्टेंबरपासून ती विक्रीसाठी उपलब्ध होईल.

AirPods Pro 3 स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

ॲपलने या इव्हेंटमध्ये AirPods Pro 3 लाँच केले आहेत. यात H3 चिप देण्यात आली आहे, जी ऑडिओची गुणवत्ता वाढवते. यात हार्ट रेट आणि शरीराचे तापमान ट्रॅक करण्याचे हेल्थ सेन्सर दिले आहेत, जे फिटनेसप्रेमींसाठी फायदेशीर आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  What is Digital Detox : डिजिटल डिटॉक्स काय आहे? प्रत्येकाने अवलंब करणं का आहे गरजेचं?)

कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 6 असून, त्यामुळे ऑडिओची गुणवत्ता स्टुडिओसारखी मिळते. या इयरफोनचे डिझाइन सुधारित करण्यात आले आहे. तसेच, त्याचे चार्जिंग केस यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. या इयरबड्सची लोकेशन 'Find My' ॲपच्या मदतीने अधिक अचूकतेने शोधता येते.

प्रत्येक इयरबड 8 तासांपर्यंत प्लेबॅक देतो, तर चार्जिंग केससह एकूण बॅटरी लाइफ 40 तासांपर्यंत आहे. AirPods Pro 3 ची किंमत जवळपास 22,000 रुपये आहे आणि ते 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Advertisement