जाहिरात

Bank Holidays 2025: 15, 16, 17 ऑगस्ट सलग 3 दिवस बँक बंद, जाणून घ्या कुठे आणि कधी बँकांना आहे सुटी?

August Month Bank Holidays 2025: RBIच्या बँकांच्या सुट्यांशी संबंधित माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी बँक हॉलिडे आहे. 16 ऑगस्ट रोजी कोणकोणत्या राज्यांमध्ये बँकांना सुटी आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया...  

Bank Holidays 2025: 15, 16, 17 ऑगस्ट सलग 3 दिवस बँक बंद, जाणून घ्या कुठे आणि कधी बँकांना आहे सुटी?
August Month Bank Holidays 2025: 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट बँक बंद?

15th August And 16th August Bank Holidays 2025: बँकांशी संबंधित महत्त्वाची कामं असतील तर लवकरात लवकर करून घ्या. कारण आठवड्याच्या शेवटी सलग येणाऱ्या सुट्यांमुळे देशातील काही राज्यांमध्ये बँक तीन दिवस बंद असणार आहेत. या आठवड्याच्या शेवटी सणउत्सवांमुळे मोठी सुटी असणार आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्य दिवस (Independence Day 2025) आणि जन्माष्टमीच्या (Janmashtami 2025) सुटीचा समावेश आहे.

15 ऑगस्टपासून के 17 ऑगस्टपर्यंत बँकांना सुटी 

15 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत बँकांना सुटी असणार आहे. पण सुट्यांचे नियम प्रत्येक राज्यांमध्ये सारखे नाहीत. RBIने अधिकृतरित्या सुट्यांची यादी जारी केलीय. जेणेकरून बँकांशी संबंधित व्यवहार करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यामुळे बँकांशी संबंधित कामं 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा.  कोणत्या राज्यांमध्ये कधी बँकांना सुटी असणार आहे? जाणून घेऊया माहिती...

15 ऑगस्ट रोजी बँक बंद राहतील 

यंदा 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day  2025) बँकांना सुटी असणार आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये जन्माष्टमी (Janmashtami 2025) आणि पारसी न्यू इअर (Parsi New Year) हे सणउत्सव देखील साजरे केले जाणार आहेत. या कारणांमुळे बँकांना सुटी असणार आहे. 

Independence Day 2025: यंदाचा स्वातंत्र्यदिन 78 वा आहे की 79 वा? दूर करा सगळ्या शंका

(नक्की वाचा: Independence Day 2025: यंदाचा स्वातंत्र्यदिन 78 वा आहे की 79 वा? दूर करा सगळ्या शंका)

16 ऑगस्ट बँक सुरू असतील की बंद बंद?

गुजरात, मिझोरम, मध्य प्रदेश, चंदिगड, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्किम, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, श्रीनगर आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जन्माष्टमीनिमित्त बँक बंद राहतील. 

16 ऑगस्ट रोजी काही राज्यांमध्ये बँकांना जन्माष्टमी उत्सवानिमित्त सुटी आहे. पण त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, गोवा आणि हिमाचल प्रदेश येथे बँक सुरू असणार आहेत.  

17 ऑगस्ट रोजी रविवार आहे, साप्ताहिक सुटी असल्याने देशभरातील बँका बंद असतील.

ऑगस्ट महिन्यातील सुटी (Bank Holidays in August 2025)

RBIच्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, ऑगस्टमध्ये एकूण 15 बँक हॉलिडे आहेत. ज्यामध्ये राष्ट्रीय सण, धार्मिक सण आणि राज्यस्तरीय सुट्यांचा समावेश आहे. दर महिन्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यातही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना सुट्या आहेत. या माहितीनुसार तुमच्या स्थानिक शाखेची किंवा आरबीआयची अधिकृत सुट्यांची यादी तपासा आणि तुमची कामं पूर्ण करा.

बँकांची ही कामं आधीच करा

  • सलग तीन दिवस सुट्या आल्याने चेक क्लिअरन्स, NEFT/RTGS व्यवहारांमध्ये विलंब होऊ शकतो. 
  • ऑनलाइन बँकिंग, UPI आणि मोबाइल अ‍ॅप सेवा कार्यरत असतील पण नेटवर्क किंवा तांत्रिक समस्या असल्यास अडचणी उद्भवू शकतात. 
  • रोख रक्कम काढणे, चेक जमा करणे आणि निधी हस्तांतरण यासारखी महत्त्वाची कामे 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com