Toilet Cleaning Hacks: टॉयलेटमध्ये सर्वाधिक घाण असते तसेच जंतू आणि दुर्गंध येते. वेळोवेळी टॉयलेट स्वच्छ केले नाही तर अस्वच्छतेमुळे गंभीर आजार पसरण्याची शक्यता आहे. म्हणून टॉयलेट आणि टॉयलेट सीट नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी लोक बाजारातील विविध प्रकारच्या, सुगंधित क्लीनर प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण इतका खर्च करुनही काही वेळेस परिणाम चांगले मिळतातच, याची खात्री नाही. याऐवजी काही सोपे आणि नैसर्गिक पद्धती वापरुनही टॉयलेट स्वच्छ करू शकता. या लेखाद्वारे आपण असाच एक सोपा आणि स्वस्त उपाय करू शकतो.
टॉयलेट स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता. मीठ हे एक नॅचरल क्लीनर आहे, याची माहिती खूपच कमी लोकांना असावी. मिठामुळे टॉयलेट सीटवरील डाग स्वच्छ होण्यास मदत मिळेल. तसेच दुर्गंध देखील कमी होईल. मिठामध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसही मिक्स करुन टॉयलेट स्वच्छ करू शकता. बेकिंग सोड्यामुळे डाग स्वच्छ होतील आणि लिंबूमुळे टॉयलेटमधील दुर्गंध कमी होईल.
(नक्की वाचा: जेवताना तुम्ही देखील वरुन मीठ मिक्स करता का? होतील 5 मोठे नुकसान)
मिठाचा वापर करुन टॉयलेट कसे स्वच्छ करावे?
- आवश्यकतेनुसार मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्रित करुन पेस्ट तयार करावी.
- टॉयलेट सीटवर ही पेस्ट टाकून ब्रशने जागा स्वच्छ करावी.
- रात्रभर टॉयलेटमध्ये पावडर तशीच ठेवून द्यावी.
- दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्याने टॉयलेट सीट स्वच्छ करावी.
(नक्की वाचा: Kitchen Tips: फ्रिजमध्ये 1 वाटी मीठ का ठेवावे?)
हानिकारक केमिकल्सच्या तुलनेत हा नैसर्गिक उपाय आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही सुरक्षित ठरू शकतो. लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठीही हा उपाय सुरक्षित ठरू शकतो. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)