Bathroom Smell Removal: बाथरूमची स्वच्छता ही घराच्या स्वच्छतेची ओळख असते. अनेकदा बाथरूम चकचकीत असूनही त्यात शिरल्यावर एक विचित्र कुबट वास (Musty Smell) येतो. ही समस्या अनेकदा ओलावा आणि व्हेंटिलेशनच्या कमतरतेमुळे उद्भवते, जिथे महागडे एअर फ्रेशनरही अपयशी ठरतात. अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही बाथरूम सुगंधित ठेवू शकता.
साबणाचे रॅपर (Empty soap wrapper hack)
साबणाचे कागदी रॅपर किंवा बॉक्स कचऱ्याच्या डब्यात फेकू नका. बाथरूममध्ये साबणाचे रॅपर ठेवून द्यावा कारण साबणाचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो.
कसा करावा वापर?
साबणाचे रिकामे रॅपर फेकून न देता ते गोळा करा. त्यामध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवा. हे रॅपर व्यवस्थित बंद करून बाथरूमच्या कोपऱ्यात किंवा वॉशबेसिनच्या खाली ठेवा.
कापूरमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि साबणाच्या सुगंधासोबत मिळून ते एक 'नॅचरल एअर फ्रेशनर' म्हणून काम करतात.
(नक्की वाचा: Better Sleep Tips: शांत गाढ झोप हवीय? झोपताना बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवावा की बंद? वाचा तज्ज्ञांचा सल्ला)

सुगंधी बाथरूमसाठी इतर काही टिप्स:
1. बेकिंग सोडा आणि इसेन्शिअल ऑइल:
एका छोट्या काचेच्या वाटीत 2 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात तुमच्या आवडत्या सुगंधी तेलाचे चार ते पाच थेंब टाका. बेकिंग सोडा दुर्गंधी शोषून घेतो आणि तेल सुगंध पसरवते.
2. नेफ्थलीन बॉल्स (डांबराच्या गोळ्या):
नेफ्थलीन बॉल्स थेट नळीत टाकण्याऐवजी एका लहान जाळीदार पिशवीत भरा आणि सिंकजवळ लटकवा. यामुळे त्याचा वास सुगंध काळ टिकतो.
(नक्की वाचा: Aloe Vera Detox Drink : उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी कसे तयार करावे अॅलोव्हेरा ड्रिंक? वाचा सोपी पद्धत)
3. कोरडी कॉफी:
बाथरूममध्ये जास्त ओलावा किंवा दमटपणा जाणवत असेल, तर एका लहान डबीत कोरडी कॉफी पावडर भरून ठेवा. कॉफी नैसर्गिकरित्या दुर्गंधी नष्ट करण्याचे काम करते.

Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world