Collagen Deficiency Issue: कोलेजनच्या कमतरतेमुळे बिघडतेय तुमचे सौंदर्य, खा या गोष्टी 15 दिवसांत दिसाल तरुण

Collagen Deficiency Issue: कमी वयामध्ये त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागणे म्हणजे शरीरातील कोलेजनच्या कमतरतेचे संकेत आहेत. योग्य लाइफस्टाइल, हेल्दी डाएट आणि ब्युटी केअर रुटीनमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळू शकेल. जाणून घेऊया माहिती..

जाहिरात
Read Time: 2 mins
"Skin Care Tips: त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसण्यामागील कारणे"
Canva

Collagen Deficiency Issue: तुमची त्वचा कमी वयातच सैल होत असेल किंवा निस्तेज दिसत असेल तर ही समस्या सामान्य नाहीय. यामागील मोठे कारण म्हणजे शरीरातील कोलेजनची कमतरता (Collagen Deficiency Issue). कोलेजन हे एक असे प्रोटीन आहे, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. पण चुकीच्या जीवनशैलीमुळे, जंक फुडच्या सेवनामुळे, ताणतणावामुळे कोलेजनचे प्रमाण कमी होऊ लागते. परिणामी त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.   

डर्मेटोलॉजिस्टने सांगितली कोलेजन कमी होण्यामागील कारणे| How To Increase Collagen

झोपेची कमतरता आणि तणाव| Collagen For Skin

डर्मेटोलॉजिस्टने सांगितलेल्या माहितीनुसार, पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्यास किंवा सतत तणावामध्ये असल्यास शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचा स्त्राव वाढतो. यामुळे कोलेजनचे उत्पादन कमी होते. परिणामी त्वचेवर दुष्परिणाम होऊ लागतात. 

उन्हामुळे होणारे परिणाम| How to Protect Collagen

तीव्र स्वरुपातील ऊन आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे तसेच कोलेजनचेही नुकसान होते. यामुळे त्वचा कोरडी आणि सैल होऊ लागते.  

(नक्की वाचा: Beauty Tips News: चाळीशीमध्ये दिसाल पंचविशीसारख्या, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा हा पिवळा चिकट पदार्थ)

प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखर | Collagen Boosting Foods

गोड पदार्थ आणि जंक फुड अति प्रमाणात खाल्ल्यास शरीरामध्ये ग्लायकेशन प्रक्रिया सुरू होते, यामुळे त्वचेचा पोत खराब होऊ लागतो. त्वचेवर सुरकुत्याही दिसू लागतात.  

Advertisement

(नक्की वाचा: White Hair Problem: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? करा है नैसर्गिक उपाय)

मद्यपान आणि धूम्रपान | Collagen Deficiency Symptoms

सिगारेट आणि दारुतील टॉक्सिक घटक रक्तामध्ये प्रवेश करतात. ज्याचे फ्री रॅडिकल्समध्ये रुपांतर होते. यामुळेही कोलेजनच्या उत्पादनावर मोठे परिणाम होतात.  

अयोग्य स्कीन केअर प्रोडक्ट्स | Skin Aging Signs

केमिकलयुक्त स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यास त्वचेचा पोत खराब होतो आणि कोलेजनच्या उत्पादनावरही परिणाम होतात. त्यामुळे डर्मेटोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करावा. 

Advertisement

त्वचेतील कोलेजनवर परिणाम होऊ नये म्हणून काय करावे? | Collagen Deficiency

  • नियमित सनस्क्रीन लावा आणि त्वचेचे उन्हापासून संरक्षण करावे. 
  • सात ते आठ तास झोपावे आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.  
  • डाएटमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश करावा. 
  • स्किन केअर रुटीनमध्ये कोलेजन बुस्टिंग प्रोडक्ट्सचा समावेश करावा.  
  • धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळावे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)