How To Use Face Serum: चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि डागविरहित राहावी, यासाठी डाएट-व्यायामापासून ते ब्युटी प्रोडक्ट्सपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरत आहात? ते प्रोडक्ट तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का? तज्ज्ञांनीच सुचवलेले प्रोडक्ट्स तुम्ही वापरत आहात का? यासह इत्यादी गोष्टींकडे तुमचे लक्ष आहे का... अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना कोणताही निष्काळजीपणा करणं टाळावे. सीरम हे देखील निरोगी त्वचेकरिता अतिशय महत्त्वाचे प्रोडक्ट आहे. सीरममुळे त्वचा तरुण, डागविरहित, निरोगी तसेच सुंदर राहण्यास मदत मिळते.
पण सीरम वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल पण बहुतांश जणांना सीरम वापरण्याची योग्य पद्धत माहितीच नाहीय. त्वचेला जास्तीत जास्त लाभ मिळावेत, यासाठी फेस सीरम चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...
(नक्की वाचा: आयुष्यात खूप त्रस्त आहात? समाधान मिळत नाहीय? जया किशोरींच्या प्रेरणादायी विचारामुळे बदलेल जीवन)
फेस सीरम वापरण्याची योग्य पद्धत
स्टेप 1 : ड्रॉपरच्या मदतीने सीरमचे केवळ तीन ते चार थेंब तळहातांवर घ्या.
स्टेप 2 : तळहात न रगडता सीरमचे थेंब तळहातांवर पसरवा.
स्टेप 3 : चेहरा व मानेच्या भागावर सीरम लावा आणि हलक्या हाताने त्वचेवर टॅप-टॅप करावे.
(नक्की वाचा: Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी)
सीरम लावल्यानंतर मसाज करावा की त्वचा डॅब करावी?
टॅपिंग मोशनमध्ये सीरम चेहऱ्यावर लावावे. जेणेकरून तुमची त्वचा सीरम पूर्णपणे शोषून घेईल.
सीरम की मॉइश्चरायझर - सर्वप्रथम काय लावावे?
सीरम लावण्याची योग्य पद्धत आता तुम्हाला समजली आहे. तर सीरम की मॉइश्चरायझर यापैकी चेहऱ्यावर सर्वप्रथम काय लावावे? या प्रश्नाचेही उत्तर जाणून घेऊया. पातळ स्वरुपात असणारे प्रोडक्ट कायम पहिल्यांदा वापरावे. या नियमानुसार चेहऱ्यावर सर्वप्रथम सीरम आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावावे. कारण पातळ टेक्श्चर असणारे प्रोडक्ट कधीही जाडसर टेक्श्चर असणाऱ्या प्रोडक्टसह सकारात्मक परिणाम देत नाही. पण जाड टेक्श्चरचे प्रोडक्ट सहजरित्या पातळ टेक्श्चर प्रोडक्ट्समध्ये एकरुप होते. त्यामुळे हा नियम कायम लक्षात ठेवा.
(नक्की वाचा: Ayushman Bharat Yojanaमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा, कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या सविस्तर)
सीरम दिवसातून किती वेळा लावावे?
फेस सीरम दिवसातून केवळ दोनदा वापरणे त्वचेसाठी योग्य ठरेल. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी सीरमचा वापर करावा.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.