जाहिरात
Story ProgressBack

Ayushman Bharat Yojanaमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा, कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या सविस्तर

Ayushman Bharat Yojana Benefits: या योजनेअंतर्गत कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय आणि लिंग यासंबंधी कोणत्याही मर्यादा नाहीत. पात्र कुटुंबास आयुष्मान गोल्डन कार्ड दिले जाऊ शकते.

Read Time: 3 min
Ayushman Bharat Yojanaमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा, कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या सविस्तर

Ayushman Bharat Yojana Benefits: भारत सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी आयुष्मान भारत योजना  (Ayushman Bharat Yojana) राबवत आहे.  ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या नावानेही ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी वर्ष 2018 मध्ये या योजनेचा शुभारंभ केला होता. ही योजना देशातील गरीब नागरिकांसाठी एक प्रकारे आरोग्य विमा योजनाच (Health Insurance Plan) आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी किंवा सूचीबद्ध करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा पुरवली जाते.  

तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा आहे का? तर तुम्ही या योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आयुष्मान योजनेचा लाभ कोणता वर्ग घेऊ शकतो आणि या योजनेच्या माध्यमातून कोणकोणते फायदे मिळू शकतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

(नक्की वाचा: Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी)

आयुष्मान योजनेचा लाभ कोण-कोण घेऊ शकतात?  

आयुष्मान भारत योजना (Ayushman Yojana) देशातील अशा लोकांना आरोग्य सुरक्षा कवच प्रदान करते, ज्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे. याव्यतिरिक्त या योजनेचा लाभ गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना दिला जातो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही निकष जारी केले आहेत.  या नियमांनुसार ज्या कुटुंबाच्या घराच्या भिंती व छताची बांधणी कच्च्या स्वरुपात आहे, ग्रामीण भागातील अशाच कुटुंबांना प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजनेचा (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) लाभ मिळेल.  

इतकंच नव्हे तर आदिवासी एससी/एसटी, भूमिहीन कुटुंब, रोजंदारी मजूर किंवा ज्या कुटुंबामध्ये एखादा दिव्यांग सदस्य आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये शारीरिकदृष्ट्या कोणीही सक्षम प्रौढ सदस्य नाही; अशा कुटुंबांनाही आयुष्मान भारत योजनेच्या (आयुष्मान योजना पात्रता) कक्षेमध्ये आणण्यात आले आहे.

तसेच आपण आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र आहात की नाहीत? याबाबतची माहिती 14555 या क्रमांकावर कॉल करून अथवा आयुष्मान अ‍ॅपद्वारे देखील तुम्ही मिळवू शकता.  

(नक्की वाचा: तिशीनंतरही दिसला तरुण, सुरकुत्याही होतील कमी; या खाद्यपदार्थांमुळे वाढेल कोलेजन)

आयुष्मान गोल्डन कार्ड म्हणजे नेमके काय?

या योजनेअंतर्गत कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय किंवा लिंग यासंबंधी कोणत्याही मर्यादा नाहीत. योजनेसाठी पात्र असणाऱ्या कुटुंबीयांना आयुष्मान गोल्डन कार्ड दिले जाऊ शकते. हे कार्ड देशातील 13 हजारहून अधिक सरकारी आणि सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये स्वीकारले जाऊ शकते. आयुष्मान गोल्डन कार्डसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकता. कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही आजारी पडल्यास हे कार्ड दाखवून मोफत उपचार सुविधा मिळवू शकता. 

(नक्की वाचा: सावधान! या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला येतेय जास्त झोप, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश)

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारांवर मिळतील मोफत उपचार?

आयुष्‍मान भारत योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेल्या आयुष्‍मान गोल्‍डन कार्डच्या माध्यमातून जुन्या आणि नव्या अशा सर्व आजारांवर तुम्ही मोफत उपचार मिळवू शकता. उपचार सुविधेमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांव्यतिरिक्त दीड हजारहून अधिक आजारांचाही समावेश करण्यात आला आहे.

आयुष्‍मान योजनेचे फायदे (Ayushman Yojana Benefits)

  • हॉस्पिटलमध्ये दाखल होताना तुम्हाला आयुष्मान कार्ड दाखवणे गरजेचे आहे.
  • यानंतर उपचारांच्या खर्चासाठी तुम्हाला कागदपत्र किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. 
  • यानुसार योजनेअंतर्गत कागदपत्र तसेच रोखरहित औषधोपचार केले जाऊ शकतात.
  • सरकारी तसेच सूचीबद्ध खासगी हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता. 
  • वैद्यकीय खर्चाव्यतिरिक्त वाहतुकीसाठी होणारा खर्चाचाही या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.   
  • VIDEO: निर्यातबंदी उठली तरीही कांद्यांचा वांदा कायम, JNPT बंदरात 400 कंटेनर अडकले

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
    Our Offerings: NDTV
    • मध्य प्रदेश
    • राजस्थान
    • इंडिया
    • मराठी
    • 24X7
    Choose Your Destination