
Hair Care Tips: तुमच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात, हे तुम्हाला माहितीय का? दिवसभराची धावपळ, प्रदूषणचा सामना केल्यानंतर आपण विश्रांती घेतो. तेव्हा केसांनाही आराम मिळतो, असे प्रत्येकाचा समज असतो. पण झोपेशी संबंधित आपल्या छोट्या सवयीमुळे केसांवर मोठे परिणाम होतात. केस बांधून किंवा मोकळे ठेवून झोपण्याच्या सवयीमुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारेल किंवा केसांचे नुकसान होईल. यापैकी कोणती सवय अधिक फायदेशीर ठरेल, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

केस बांधून की मोकळे ठेवून झोपणे फायदेशीर ठरले? (Kes Mokale Sodun Zopave Ka?)
तुमच्या केसांची लांब लहान असेल तर तुम्ही केस मोकळे सोडून झोपू शकता, यामुळे फारसे नुकसान होणार नाही. पण केस लांबसडक आणि पातळ असतील तर केसांचा गुंता होऊन केस तुटणे, केस कोरडे होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दरम्यान केस मोकळे ठेवल्यास स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि मुळांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो, असेही म्हणतात.
झोपताना केस बांधून झोपण्याचे फायदे (How to Tie Hair While Sleeping)
केस लांबसडक आणि घनदाट असल्यास सैल वेणी बांधण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो. यामुळे केसांचा गुंता होणार नाही, केस तुटणार नाही. केसांची वेणी सैल बांधल्यास स्कॅल्पच्या भागातील घर्षण कमी होईल आणि केसांच्या मुळांवर ताण येणार नाही, केसांची वाढ होण्यासही मदत मिळेल.

केसांची देखभाल कशी करावी? (Disadvantages Of Sleeping With Open hair)
- केसांची सैल वेणी बांधून झोपावे.
- कॉटन कापडाऐवजी रेशीम कापडाच्या उशीचा वापर करावा.
- घट्ट स्वरुपातील रबरचा वापर करू नये.
- केसांना सीरम किंवा तेल लावून झोपावे.
- केसांना तेल लावले असेल तर केस मोकळे सोडून झोपू नका.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world