Avocado Benefits For Skin: मऊ, सुंदर, सतेज आणि तरुण त्वचेसाठी नियमित एक अॅव्होकाडो खाणे फायदेशीर ठरू शकते. या फळामुळे शरीरासह तुमच्या त्वचेलाही कित्येक फायदे मिळतील. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, अॅव्होकाडोमधील हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन आणि खनिजे त्वचेसाठी नैसर्गिक टॉनिकप्रमाणे काम करतात. या फळामुळे त्वचेला आतील बाजूने पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. नियमित एक अॅव्होकाडो खाल्ल्यास त्वचेवर काय परिणाम होतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
अॅव्होकाडो खाल्ल्यास त्वचेला कोणते फायदे मिळतील?
1. त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल
अॅव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही व्हिटॅमिन्समुळे त्वचेला ओलावा मिळतो, कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यातील हेल्दी फॅट्समुळे (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) त्वचा मऊ होते.
2. वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात
अॅव्होकाडोतील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिडमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत मिळते. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आणि फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचे झालेले नुकसान भरुन निघण्यास मदत मिळते, ज्यामुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणे टाळता येतात.
3. त्वचेची लवचिकता वाढते
रीसर्चनुसार जी लोक डाएटमध्ये अॅव्होकाडो यासारख्या हेल्दी फॅट्सचा समावेश करतात, त्यांची त्वचा सैल पडत नाही. अॅव्होकाडोतील पोषणतत्त्वांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.
4. मुरुम आणि त्वचा संसर्ग
अॅव्होकाडोमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांचा समावेश आहे, यामुळे पिंपल्सच्या समस्येतून सुटका मिळू शकते. याव्यतिरिक्त अॅव्होकाडोच्या तेलानेही चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Dark Lips And Pigmentation: ओठांच्या आसपासची त्वचा का काळी पडते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय)
5. त्वचेवर नैसर्गिक तेज येते
अॅव्होकाडोतील बायोटिन आणि व्हिटॅमिन सीमुळे शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढते, यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Anti Aging Tips: पंचेचाळीशीमध्ये दिसाल पंचविशीप्रमाणे तरुण, जपानी लोकांच्या या 10 सवयी करा फॉलो)
6. अॅव्होकाडो फेसपॅक
अॅव्होकाडो खाण्यासह तुम्ही यापासून फेसपॅकही तयार करून चेहऱ्यावर लावू शकता.
कसे तयार करायचे फेसपॅक?
- अर्धे पिकलेले अॅव्होकाडो, एक चमचा मध आणि एक चमचा नारळाचे तेल एकत्रित मिक्स करा.
- पेस्ट तयार झाल्यानंतर 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
- फेसपॅकमुळे त्वचेला मॉइश्चराइझर मिळेल आणि चेहऱ्यावर चमकही येईल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.
- त्वचेचा कोरडेपणा, मुरुम आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)