जाहिरात

Dark Lips And Pigmentation: ओठांच्या आसपासची त्वचा का काळी पडते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय

Dark Lips And Pigmentation: तुमच्या ओठांच्या आसपासची त्वचा काळवंडली असेल तर तज्ज्ञांकडून याबाबत उपाय जाणून घ्या.

Dark Lips And Pigmentation: ओठांच्या आसपासची त्वचा का काळी पडते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय
"Beauty Tips: ओठांच्या आसपासचा काळेपणा कसा कमी करावा?"
Canva

Dark Lips And Pigmentation: ओठांच्या आसपासची त्वचा काळी पडणे ही समस्या सामान्य आहे. विशेषतः महिला या समस्येने अधिक त्रासलेल्या असतात. ही समस्या निर्माण होण्यामागे काही गोष्टी कारणीभूत असतात. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती... 

तज्ज्ञ काय म्हणतात?

सर्टिफाइड स्किनकेअर कन्सल्टंट आणि कोच निपुण कपूर यांनी यु-ट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करुन याबाबत माहिती दिलीय. बहुतांश वेळेस ही समस्या शरीराचे आतील आरोग्य आणि स्किन केअर रुटीनशी संबंधित असल्याचे ते म्हणाले आहेत.

ओठांच्या आसपासची त्वचा काळी का पडते?

व्हिटॅमिन आणि खनिजांची कमतरता

स्किनकेअर एक्सपर्टच्या माहितीनुसार, शरीरातील लोह, हिमोग्लोबिन आणि व्हिटॅमिन 'डी'च्या कमतरतेमुळे त्वचा काळी पडू शकते.

थायरॉइड असंतुलन 

थायरॉइडच्या समस्येमुळेही त्वचेवर पिगमेंटेशन येऊ लागतात.

सूर्यप्रकाश आणि डिहायड्रेशन 

उन्हामध्ये अधिक काळ राहिल्यासही किंवा योग्य मॉइश्चराइझरचा वापर न केल्यासही त्वचा काळी पडू शकते. 

काळ्या पडलेल्या त्वचेपासून कशी मिळवावी सुटका?

स्किनकेअर कन्सल्टंट निपुण कपूर यांनी सांगितलं की, त्वचा काळी पडत असेल सर्वप्रथम तुम्ही रक्त तपासणी करावी. लोह, हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी आणि थायरॉइडशी संबंधित रक्त तपासणी करुन घ्या. रक्त तपासणीदरम्यान काही आढळल्यास डॉक्टर किंवा न्युट्रिशनिस्टचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करुन शरीर आतील बाजूने निरोगी ठेवावे. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर दिसेल.  

स्किन केअर रुटीन

निपुण पुढे असंही म्हणाले की, त्वचा निरोगी राहण्यासाठी स्किन केअर रुटीन योग्य पद्धतीने फॉलो करणंही आवश्यक आहे.  

(नक्की वाचा: Collagen Deficiency Issue: कोलेजनच्या कमतरतेमुळे बिघडतेय तुमचे सौंदर्य, खा या गोष्टी 15 दिवसांत दिसाल तरुण)

स्किन केअर रुटीन कसे फॉलो करावे?

  • चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर नियासिनमाइड लावा.
  • व्हिटॅमिन सी देखील वापरू शकता. 
  • यानंतर आयक्रीम, मॉइश्चराइझर आणि सनस्क्रीन नक्की लावा.
  • रात्रीचंही रुटीन फॉलो करा.
  • आठवड्यातून तीनदा अ‍ॅलेजिक अ‍ॅसिड आणि नियासिनमाइडचा वापर करावा. 
  • आठवड्यातून दोनदा रेटिनॉल आणि नियासिनमाइड लावा.  
  • रात्री कोजिक अ‍ॅसिड आणि नियासिनमाइड एकत्रित नक्की वापरा.

(नक्की वाचा: Beauty Tips News: चाळीशीमध्ये दिसाल पंचविशीसारख्या, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा हा पिवळा चिकट पदार्थ)

त्वचेशी संबंधित या गोष्टींची काळजी घ्या

  • कोणतेही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट करा. 
  • प्रोडक्टमुळे चेहऱ्यावर जळजळ होऊ लागल्यास, खाज आल्यास, अ‍ॅलर्जी झाल्यास प्रोडक्ट वापरू नये. 
  • उन्हामध्ये जाण्यापूर्वी चेहरा, हात, मानेवर सनस्क्रीन लावावे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com