जाहिरात

Anti Aging Tips: पंचेचाळीशीमध्ये दिसाल पंचविशीप्रमाणे तरुण, जपानी लोकांच्या या 10 सवयी करा फॉलो

Anti Aging Tips: जपानी नागरिकांच्या आरोग्य आणि तरुण दिसण्यामागील सीक्रेट केवळ आनुवंशिकता नसते तर दैनंदिन जीवनातील त्यांच्या सवयी देखील महत्त्वाच्या आहेत.

Anti Aging Tips: पंचेचाळीशीमध्ये दिसाल पंचविशीप्रमाणे तरुण, जपानी लोकांच्या या 10 सवयी करा फॉलो
Beauty Tips: जपानी लोकांच्या सौंदर्याचे सीक्रेट

Anti Aging Tips: जपान हा असा देश आहे, जेथे लोकांचे आयुष्यमान सर्वात जास्त असल्याचे आढळलंय. शिवाय वयाच्या 40-45मध्येही लोक 20-25 प्रमाणे तरुण दिसतात. केवळ आनुवंशिकताच नव्हे तर दैनंदिन जीवनातील सवयी त्यांचे सौंदर्य आणि निरोगी आरोग्याचे सीक्रेट आहे. 

1. कोवळे ऊन

जपानी लोक पहाटे उठतात. सकाळच्या कोवळ्या उन्हाद्वारे व्हिटॅमिन डी मिळतात. यामुळे हाडे आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. शिवाय त्वचा आणि केसांचे आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते. 

2. मेडिटेशन

ध्यानधारणा करणे हा जपानी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते आणि मानसिक शांती मिळते. ताणतणावामुळे वृद्धत्वाची लक्षणे चेहऱ्यावर दिसतात. 

3. रिकाम्या पोटी पाणी पिणे

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिणे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. शरीराची चयापचयाची गती जलद होते आणि त्वचा निरोगी तसेच सुंदर होण्यास मदत मिळते. 

4. मॉर्निंग स्ट्रेचिंग 

सकाळच्या वेळेस स्ट्रेचिंग एक्सरसाइझ करावे, यामुळे शरीराच्या सर्व क्रिया योग्य पद्धतीने पार पडतात. रक्ताभिसरण प्रक्रियाही सुधारते. स्नायू मजबूत आणि लवचिक होतात.

5. हंगामी फळं 

जपानी लोक डाएटमध्ये हंगामी फळांचा समावेश करतात. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. 

6. आंबवलेले पदार्थ

डाएटमध्ये आंबवलेल्या पदार्थांचाही समावेश केला जातो. यामुळे शरीराची पचनप्रक्रिया, रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते. 

7. ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. हृदयाचे आरोग्यही निरोगी राहेत.

8. डबल क्लीजिंग आणि स्किन केअर

जपानी लोक स्किनकेअरची सर्वात जास्त काळजी घेतात. डबल क्लीजिंगमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि त्वचा तरुणही दिसते.  

Dark Lips And Pigmentation: ओठांच्या आसपासची त्वचा का काळी पडते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय

(नक्की वाचा: Dark Lips And Pigmentation: ओठांच्या आसपासची त्वचा का काळी पडते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय)

9. आभार व्यक्त करणे

'इकीगाई' म्हणजे जीवनाचे उद्देश. जपानी लोक नाते आणि कामांमध्ये आनंद शोधतात. आभार व्यक्त करण्याची सवय सकारात्मकता आणि तणावमुक्त ठेवण्यात मदत करते, यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात.  

Hair Growth Faster Tips: केसांची झटपट वाढ करतील या 5 आयुर्वेदिक पावडर, केसगळती-कोंडा होईल कमी

(नक्की वाचा: Hair Growth Faster Tips: केसांची झटपट वाढ करतील या 5 आयुर्वेदिक पावडर, केसगळती-कोंडा होईल कमी)

10. फॉरेस्ट बाथिंग

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त जपानी लोक दैनंदिन जीवनातील वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यातही वेळ घालवतात. यामुळे तणाव कमी होण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. शुद्ध हवा आणि निसर्गामुळे मन शांत राहण्यास मदत मिळते.   

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com