जाहिरात

सफरचंद खाण्याचे फायदे - तोटे, खाण्याची योग्य पद्धत अन् वेळ कोणती?

सफरचंद एक पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ आहे. जे योग्य वेळी आणि प्रमाणात खाल्ल्यास शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते.

सफरचंद खाण्याचे फायदे - तोटे, खाण्याची योग्य पद्धत अन् वेळ कोणती?

Benefits and Side Effects of Apple: लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, सफरचंद (apple) हे फळांमध्ये सर्वात उत्तम आणि आरोग्यदायी फळ आहे. यात केवळ भरपूर प्रमाणात फायबरच नाही, तर अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा (vitamins and minerals) देखील चांगला स्रोत आहे. असे म्हणतात की, रोज एक सफरचंद तुम्हाला अनेक आजारापासून दूर ठेवतो. म्हणजेच, रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची गरज कमी होते. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरचे भरपूर प्रमाण असल्याने ते शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. पण प्रत्येक गोष्टीप्रमाणेच सफरचंद देखील योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात खाल्ले तरच फायदेशीर ठरते. अन्यथा सफरचंदाचे तोटेही होऊ शकतात. चला, सफरचंद खाण्याचे फायदे, तोटे आणि खाण्याची योग्य वेळ व पद्धत याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

सफरचंद खाण्याचे फायदे (Benefits of Eating Apple)

पचनशक्ती मजबूत होते: 
सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचनसंस्था निरोगी ठेवते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

हृदयाला निरोगी ठेवते: 
सफरचंदात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पेक्टिन वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात. चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात. यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.

रक्तातील साखर नियंत्रित करते: 
मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी सफरचंद फायदेशीर आहे. यात नैसर्गिक साखर असते, जी हळूहळू शरीरात मिसळते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते: 
सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करतात.

वजन कमी करण्यास मदत करते: 
यात कॅलरी खूप कमी आणि फायबर जास्त असते. सफरचंद खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले जाणवते. ज्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

त्वचा आणि केसांसाठी चांगले: 
सफरचंद खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. सुरकुत्या कमी होतात. यात असलेले व्हिटॅमिन ए आणि ई केस गळण्यापासून थांबवण्यासही मदत करतात.

सफरचंद खाण्याचे तोटे (Side Effects of Eating Apple)

जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते: 
जास्त सफरचंद खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे आणि जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेचे प्रमाण हानिकारक असू शकते: 
जरी सफरचंद मधुमेहासाठी चांगले असले, तरी जास्त खाल्ल्याने त्यात असलेली साखर नुकसान पोहोचवू शकते.

रिकाम्या पोटी जास्त सफरचंद खाणे योग्य नाही: 
यात असलेली ॲसिडिटी (अम्लता) कधीकधी गॅस्ट्रिक समस्या वाढवू शकते.

सफरचंदाच्या बिया हानिकारक असतात: 
सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइड (Cyanide) नावाचा विषारी पदार्थ असतो. त्यामुळे, बिया कधीही खाऊ नका.

सफरचंद खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ (Right Way And Time To Eat Apple)

सकाळची वेळ सर्वात चांगली: 
सकाळी नाश्त्यामध्ये सफरचंद खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते आणि पचनक्रियाही चांगली राहते.

सालीसकट खा: 
सफरचंदाची साल पोषक तत्वे आणि फायबरने परिपूर्ण असते. म्हणून, ते नेहमी चांगले धुऊन सालीसकट खावे.

रात्री खाऊ नका: 
झोपण्यापूर्वी सफरचंद खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.

ज्यूसऐवजी पूर्ण सफरचंद खा: 
ज्यूसमध्ये फायबर कमी होते आणि साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे, ज्यूसऐवजी पूर्ण सफरचंद खाणे अधिक फायदेशीर आहे.

सफरचंद एक पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ आहे. जे योग्य वेळी आणि प्रमाणात खाल्ल्यास शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते. सकाळी नाश्त्यामध्ये एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते. फक्त लक्षात ठेवा की त्याच्या बिया खाऊ नयेत आणि रात्री सफरचंद खाणे टाळावे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com