Benefits of eating eggs: अंड आरोग्यासाठी पॉवरहाऊस आहे. स्वस्त, चविष्ट आणि पोषणमुल्यांनीयुक्त असलेलं अंड सहजपणे स्वयंपाकघरात असतं. दररोज अंड खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का? अंड कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, सोप्या भाषेत समजून घेऊया. सहा रुपयांना मिळणारं अंड तुमच्या आरोग्यासाठी गेमचेंजर ठरू शकतं.
दररोज अंड खाण्याचे फायदे आणि योग्य पद्धत...l Benefits and correct way to eat eggs daily: Know when to eat and when to avoid them, answers to all 10 questions
1 अंड 100 टक्के शाकाहारी असतं का?
सर्वसाधारपणे अंडी शाकाहारी आहारात सामील केलं जात नाही. शाकाहारी आहारात मांस किंवा समुद्रातील मासे आदी खाद्यपदार्थांचा समावेश केला जात नाही. मात्र यात अपवादही असतात. तर काहींनुसार अंड मांसाहारी आहे. कारण कोंबडी अंड देते. मात्र काही ठिकाणी शाकाहार करणारे अंड आमि डेअर उत्पादनाचा आहारात समावेश करतात. तर काही या दोन्हीपासून दूर राहतात.
विविध प्रकारच्या आहाराच्या पद्धतीत अंड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा...
ओवो-शाकाहारी (Ovo-vegetarian): मांस, मासे आणि डेअर उत्पादनांपासून दूर राहतात, मात्र अंड्याचा आहारात समावेश
लॅक्टो-ओवो शाकाहारी (Lacto-ovo vegetarian): मांस आणि मासेपासून दूर राहतात. मात्र अंड आणि डेअरी उत्पादनांचा आहारात समावेश
लॅक्टो-शाकाहारी (Lacto-vegetarian)) : अंडं, मांस आणि मासे खात नाही, मात्र डेअर उत्पादनांचा आहारात समावेश
विगन (Vegan): पशू आणि पशू-व्युत्पन्न उत्पादनांपासून दूर राहतात, ज्यात मासं, मासे, अंडी, डेअरी उत्पादन आणि अनेकदा मधाचाही समावेश.
2. अंड खाण्याचे फायदे काय आहेत, अंड खाल्ल्याने शरीराला काय फायदा होतो? (Benefits of Eating eggs In Marathi)
मसल्स मजबूत : अंडं हाय-क्वालिटी प्रोटीनचा स्त्रोत, ज्यामुळे मसल्स रिपेयर आणि वाढीसाठी मदत होते. जिममध्ये जाणाऱ्यांसाठी फायदेशीर.
मेंदूचं आरोग्य: अंड्यांमध्ये कोलीन असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. ते स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित कराला मदत करतं.
दृष्टी सुधारते: अंड्यातील पिवळ्या भागामध्ये व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतं. जे डोळ्यांचे आरोग्य वाढवते आणि मोतीबिंदूचा धोका कमी करते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत : अंडी खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरलेले राहते. जास्त खाणे कमी होते. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
मजबूत हाडे: अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस असतं. ज्यामुळे हाडांचा आरोग्य सुधारतं.
3 अंड खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत
ब्रेकफास्ट : सकाळी अंड खाल्ल्याने एनर्जी राहते. उकडलेलं, ऑमलेट किंवा स्क्रॅम्बल्ड अंड परफेक्ट आहे.
व्यायामानंतर : व्यायामानंतर एक ते दोन उकडलेली अंडी खा. यामुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी फायदेशीर
उकडलेलं अंड सर्वात हेल्दी. यात तेल किंवा बटर नसतं. ऑमलेट बनवतानाही कमी तेल वापरा. सॅलेड किंवा सँडविचमध्येही अंड वापरू शकता.
4. अंड कधी खाऊ नये?
रात्री उशीरा : झोपण्यापूर्वी अंड खाल्ल्याने पचनक्रिया धीमी होते. ज्यामुळे पोट जड वाटू शकतं.
कच्चं अंड : कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं अंड खाल्ल्याने साल्मोनेला बॅक्टेरियाचा धोका असतो. ज्यामुळे फूड पॉइजनिंग होण्याची भीती असते.
नक्की वाचा - Fatty Liver: फॅटी लिव्हर होण्यामागे ही आहेत गंभीर कारणं, सुटका मिळवण्यासाठी काय खावं? वाचा संपूर्ण यादी
5. अंडी खाण्याचे नुकसान?
अंड सर्वांसाठी चांगलं आणि सुरक्षित मानलं जातं. मात्र काहींना अधिक काळजी घेण्याची गरज असते.
एलर्जी : काहींना अंड्याची एलर्जी असते. त्वचेवर चट्टे, पोट खराब होणे अशी लक्षणं दिसतात. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हायकोलेस्टेरॉल : तुम्हालाही हाय कोलेस्टेरॉल असेल तर पिवळा बलक खाऊ नये. यात कोलेस्टेरॉल जास्त असतं. आठवड्यात 3-4 पिवळा बदल पुरेसा आहे.
लिवर प्रॉब्लेम: लिवरसंबंधित आजार असणाऱ्यांना अंड कमी खावेत आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
पोटाचे आजार : तुम्हाला IBS किंवा अल्सर असेल तर तळलेलं अंड पोटातील जळजळ वाढवू शकतं. उकडलेलं अंड ट्राय करा.
दररोज 1-2 अंडी खाणं अधिकांश लोकांसाठी हेल्दी आणि सुरक्षित आहे. हा स्वस्त आणि सहजपणे मिळणारा टेस्टी ऑप्शन आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास फायदा होईल. आरोग्यासंबंधित त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6. 1 देशी अंड्यात किती प्रोटीन असतं?
अंडी हे निसर्गातील सर्वात पौष्टिक अन्नांपैकी एक आहे. एका मोठ्या (53 ग्रॅम) ग्रेड-ए अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिनं आणि फक्त 70 कॅलरीज असतात.
7. अंड हा मांसाचा चांगला पर्याय ठरू शकतो?
नक्कीच! अंड हा एक सुपरफूड आहे. जो रेड मीट, चिकन, मासे यांच्या तुलनेत स्वस्त सह आणि प्रभावी पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. दोन अंड्यातून 12.7 ग्रॅम प्रोटीन मिळतं. हे पुरुषांसाठी आवश्यकतेच्या अंदाजे २०%, महिलांसाठी २७% आणि ४ ते ८ वयोगटातील मुलांसाठी अंदाजे ६४% प्रथिनांची गरज पूर्ण करते. अंड्यांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो आम्ल देखील असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
8. अंड्यात कोणते विटॅमिन्स असतात?
राइबोफ्लेविन (विटामिन बी2), विटामिन डी, विटामिन ई, पँटोथेनिक अॅसिड (विटामिन बी5), विटामिन बी12, विटामिन ए, फोलेट आणि बायोटिन विटॅमिन्स आढळतात. .
9. अंड्याचा पिवळा बलक खायचा की नाही?
अंड्यातील पिवळा बदल भरपूर पोषक तत्वोंनी भरपूर असतो. मात्र याचं अतिरेकी सेवन केल्याने काही नुकसान होऊ शकतं. पिवळ्या बलकात प्रोटीन, विटॅमिन D, B12, आर्यन आणि चांगले फॅट्स असतात. यामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं. अंड्याच्या पिवळ्या बलकात साधारण 180 ते 200 मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असतं. दररोज जास्त पिवळा बलक खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचा स्तर वाढू शकतो. यातून हृदयाचे आजार, रक्तदाब आणि स्ट्रोकची भीती वाढू शकते.
10. अंड्यातील पिवळा बलक खाण्याचे दुष्परिणाम?
हृदयरोग, उच्च कोलेस्टेरॉल किंवा मधुमेह असलेल्यांनी अंड्यातील पिवळ्या भागाचे सेवन मर्यादित करावे. किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करावे. जास्त प्रमाणात पिवळ्या भागाचे सेवन केल्याने चरबी वाढू शकते आणि वजन वाढू शकतं. शिवाय, काही लोकांना पचनाच्या समस्या किंवा पिवळ्या भागाची ऍलर्जी होऊ शकते.यकृताच्या समस्या असलेल्या लोकांनी देखील ते सेवन करणे टाळावे कारण ते त्यांची स्थिती बिघडू शकते.
11. किती अंड्याचा पिवळा भाग खाऊ शकतो?
हेल्दी लाइफस्टाइलसाठी अंड्याचा पांढरा भाग फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि फॅट कमी असतं. त्यामुळे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा अंड्याचं पिवळं बलक खाऊ शकता.

12. कोणत्या आजारात अंडी खाऊ नये?
साल्मोनेला संसर्गादरम्यान अंडी टाळावीत, विशेषतः कच्ची किंवा कमी शिजवलेली अंडी खाऊ नये. कारण साल्मोनेला बॅक्टेरिया बहुतेकदा कच्च्या किंवा कमी शिजवलेल्या अंड्यांमध्ये आढळतात. जर एखाद्या संक्रमित व्यक्तीने अशी अंडी खाल्ली तर संसर्ग वाढू शकतो.
बरे झाल्यानंतरही, नेहमी पूर्णपणे शिजवलेले अंडी खा, म्हणजेच पांढरे आणि पिवळे दोन्ही भाग पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
साल्मोनेला हा एक संसर्ग आहे जो काही लोकांसाठी खूप गंभीर असू शकतो. या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे अनेकदा अतिसार, उलट्या, ताप आणि पोटात कळा येणे यासारख्या समस्या उद्भवतात. ही लक्षणे सामान्यतः संसर्गाच्या 6 तास ते 6 दिवसांच्या आत दिसून येतात आणि 4 ते 7 दिवस टिकू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, लोक औषधोपचार किंवा प्रतिजैविकांशिवाय हळूहळू बरे होतात, परंतु कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांसाठी हा आजार अधिक धोकादायक असू शकतो.
13. एका दिवसात किती अंडी खावीत?
कोणी किती अंडी खावीत हे प्रत्येकाचं शरीर आणि जीवनशैलीवर अवलंबून आहे. सर्वसाधारपणे निरोगी व्यक्ती दररोज एक किंवा दोन अंडी खाऊ शकतो. यामुळे शरीराला आवश्यर प्रोटीनस विटॅमिन आणि खनिजं मिळतात. ज्यामुळे दिवसभर ऊर्जा राहते.
शारीरिकदृष्ट्या सक्रिय: शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती (खेळ खेळणारी किंवा जिमला जाणारी व्यक्ती) तर दिवसातून दोन ते तीन अंडी खाऊ शकतात. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते.
हृदयरोग: हृदयरोग किंवा कोलेस्टेरॉल असलेल्यांनी अंड्यांचं सेवन मर्यादित करावं. अशा व्यक्ती आठवड्यातून तीन ते चार अंडी खाऊ शकतात, परंतु पांढऱ्या भागावर चिकटून राहणे चांगले, कारण त्यात जास्त प्रथिने आणि कमी चरबी असते.
मुलांसाठी: दिवसातून एक अंडे पुरेसे आहे, जे त्यांच्या वाढीस मदत करतं आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
14. अंडी कच्ची खावीत की शिजवून?
कोणत्याही संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अंडी नेहमीच पूर्णपणे शिजवली पाहिजेत. एकंदरीत, जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल, तर दररोज एक ते दोन उकडलेली अंडी खाणे शरीरासाठी फायदेशीर आणि सुरक्षित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
