जाहिरात

Fatty Liver: फॅटी लिव्हर होण्यामागे ही आहेत गंभीर कारणं, सुटका मिळवण्यासाठी काय खावं? वाचा संपूर्ण यादी

Fatty Liver: फॅटी लिव्हरची समस्या कोणत्या कारणांमुळे होते, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा; जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Fatty Liver: फॅटी लिव्हर होण्यामागे ही आहेत गंभीर कारणं, सुटका मिळवण्यासाठी काय खावं? वाचा संपूर्ण यादी
Fatty Liver: फॅटी लिव्हरच्या समस्येतून सुटका कशी मिळवावी?
Canva

Fatty Liver: बदलत्या लाइफस्टाइलनुसार फॅटी लिव्हरची समस्या सामान्य पण गंभीर होत चाललीय. या आजाराची मोठमोठी लक्षणं आढळून येत नाही पण बहुतांश वेळेस निदान होईपर्यंत यकृताचे बरेच नुकसान झालेले असते. घरगुती उपाय तसेच डाएटमध्ये काही बदल केल्यास समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. फॅटी लिव्हर म्हणजे शरीराच्या या अवयवामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होणे. यकृताच्या एकूण वजनापेक्षा 5-10 टक्के अधिक प्रमाणात चरबी जमा होते, या स्थितीस फॅटी लिव्हर असे म्हणतात. यामुळे पचनशक्ती कमकुवत होते.

फॅटी लिव्हर होण्यामागील कारणं

फॅटी लिव्हरची समस्या उद्भवण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त प्रमाणात मद्यपान करणे यामुळे थेट लिव्हरचे नुकसान होते. याव्यतिरिक्त लठ्ठपणा, तेलकट पदार्थ आणि फास्टफुडचे अधिक सेवन करणे, मधुमेह, एका ठिकाणी तास-न्-तास बसणं आणि कमी व्यायाम करणे, काही औषधांचा जास्त प्रमाणात वापर करणे, मानसिक तणाव आणि अनियमित जीवनशैली इत्यादी गोष्टी जबाबदार असू शकतात. आयुर्वेदातील माहितीनुसार, शरीरामध्ये जेव्हा चरबी वाढते आणि अग्नी कमकुवत होतो, त्यावेळेस यकृताच्या पेशी चरबीचे विघटन करण्यास असमर्थ ठरतात आणि फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते. 

फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय 

फॅटी लिव्हरची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती औषधोपचार करू शकता. उदाहरणार्थ आवळ्याचा रस प्यायल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. हळदीचे दूध प्यायल्यास यकृताला आलेली सूज कमी होईल. त्रिफळ चूर्णामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी आणि यकृती स्वच्छ होईल. कडुलिंब आणि गुळवेलीमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. पपई आणि लसूणमुळे यकृतावरील ताण कमी होऊन चरबी घटण्यास मदत मिळेल. 

आरोग्यदायी जीवनशैली 

  • जीवनशैलीमध्ये काही ठराविक बदल करणं आवश्यक आहे. 
  • नियमित कमीत कमी 30 मिनिट चालण्याचा व्यायाम करावा, योग आणि प्राणायम करावे, मद्यपान-धूम्रपानापासून दूर राहा.
  • तेलकट आणि पाकिटबंद पदार्थ वर्ज्य करा. 
  • डाएटमध्ये हिरव्या भाज्या, हंगामी फळं, अख्खे कडधान्य, डाळींचा समावेश करावा आणि पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. 
  • गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. 

आवळ्याचा रस कसा तयार करावा? 

  • एक आवळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. 
  • आवळ्याचे छोटे-छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासोबत वाटा. 
  • हवे असल्यास त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करू शकता.  

Amla Juice Benefits: सलग 15 दिवस आवळ्याचा ज्युस प्यायल्यास काय होईल?

(नक्की वाचा: Amla Juice Benefits: सलग 15 दिवस आवळ्याचा ज्युस प्यायल्यास काय होईल?)

हळदीचे दूध कसे प्यावे?

  • ग्लासभर दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करा. 
  • तुम्हाला हवे असल्यास दूध गरम किंवा थंड करून पिऊ शकता. 

Hair Care Tips: अ‍ॅलोव्हेरा थेट केसांवर लावू शकतो का? 99% लोकांना योग्य पद्धत माहितीच नाही

(नक्की वाचा: Hair Care Tips: अ‍ॅलोव्हेरा थेट केसांवर लावू शकतो का? 99% लोकांना योग्य पद्धत माहितीच नाही)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )
Listen to the latest songs, only on JioSaavn.com